उल्हासनगरमध्ये शहिदी नगर कीर्तन यात्रेचे स्वागत
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये धन धन गुरू तेग बहादूर साहिब यांच्या ३५०व्या शहादत गुरुपर्वानिमित्त शहिदीनगर कीर्तन यात्रा काढण्यात आली होती. त्याचे स्वागत उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ येथील धन गुरुनानक दरबार डेरा संत बाबा थाहीरिया सिंह साहिब दरबारात करण्यात आले.
दरबारप्रमुख भाईसाहब त्रिलोचन सिंह साहिब ऊर्फ टिल्लू भाईसाहब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्वागत सोहळ्यात संगतने पुष्पवृष्टीतून श्रद्धांजली अर्पण केली. भाविकांनी गुरू गोविंद सिंह साहिब जींच्या दुर्मिळ शस्त्रांचे दर्शन घेतले. ही पवित्र यात्रा गुरुद्वारा डुबरी साहिब येथून सुरुवात झाली. शुक्रवारच्या सकाळी उल्हासनगर कॅम्प ३ मधील प्रसिद्ध दरबारात पोहोचली. याप्रसंगी शहरातील सर्व संगतने भक्तिभावाने यात्रेचे स्वागत केले. गुरुग्रंथ साहिब जी, पंच प्यारे तसेच गुरू गोविंद सिंह साहिब जींच्या पवित्र शस्त्रांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दरबार परिसर गुरुवाणीच्या निनादाने, भजनी कीर्तनाने आणि जयघोषांनी दुमदुमून गेला. श्रद्धाळूंनी गुरु गोविंद सिंह साहिब जींच्या शस्त्रांचे दर्शन घेत गहिवरलेल्या भावनेने माथा टेकला. पवित्र पांडालमध्ये आकर्षक प्रकाशयोजना, फुलांची सजावट आणि अखंड कीर्तनामुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक बनले.
दरबार प्रमुख टिल्लू भाईसाहब म्हणाले, धन धन गुरू तेग बहादूर जींच्या शहादतीमागे धर्म, मानवता आणि नीतिमूल्यांचे संरक्षण दडलेले आहे. त्यांच्या स्मरणार्थ निघालेल्या या शहिदीनगर कीर्तन यात्रेने उल्हासनगरचा प्रत्येक नागरिक धन्य झाला आहे. कार्यक्रमादरम्यान दरबार समिती आणि स्थानिक सेवादारांनी यात्रेतील प्रतिनिधींचा सन्मान करून सर्वांना लंगरचा प्रसाद वाटला. यात्रेनिमित्त उल्हासनगरमध्ये भक्ती, सेवा आणि एकतेचा संदेश पसरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.