दिबांच्या नावासाठी भूमिपुत्र आक्रमक

दिबांच्या नावासाठी भूमिपुत्र आक्रमक

Published on

दिबांच्या नावासाठी भूमिपुत्र आक्रमक
विमानातळ नामकरण लढा व्यापक करण्याचा निर्धार
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा पेटला आहे. विमानतळाचे नुकतेच उद्घाटन झाले असले तरी त्याला अधिकृत नाव दिलेले नाही. त्यामुळे नवी मुंबईतील आगरी-कोळी समाज, प्रकल्पग्रस्तांचे नेते मोठ्या आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.
नवी मुंबईच्या जडणघडणीतील दि. बा. पाटील यांच्या स्थानिक योगदानामुळे २०२१ पासून स्थानिक आगरी-कोळी समाजाकडून संघर्ष सुरू आहे. अशातच विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात दिबांच्या नावाची घोषणा झाली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची भावना आहे. विमानतळाच्या नावावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर दिघा येथे खासदार सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकही पार पडली. या बैठकीत ३ डिसेंबर रोजी सरकारविरोधात पाचही जिल्ह्यातील भूमिपुत्र एकत्रित आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नामकरणाचा वाद हा फक्त नवी मुंबई पुरताच मर्यादित राहिला नसून ठाणे, मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यापर्यंत गेला आहे.
-------------------------------
विमानतळ लोकापर्णाच्या दिवशी दिबांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे वाटले होते, पण तसे झाले नसल्याने भूमिपुत्र नाराज झाला आहे. राज्य सरकारने आमच्या मागणीची दखल घेऊन याबाबतचा सकारात्मक निर्णय घ्यावा.
- मनोहर पाटील, एमआयडीसी सिडको कृती समिती, अध्यक्ष
------------------------------
सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली असली तरी आम्ही गाफील राहणार नाही. सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जाईल यावर विश्वास आहे. नामकरणाची लढाई पाच ही जिल्ह्यात व्यापक करणार असून, आगामी निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब नक्कीच उमटेल.
- नीलेश पाटील, अध्यक्ष, आगरी-कोळी युथ फाउंडेशन
--------------------------
सरकारकडून फसवणूक झाली आहे. नाव देणार असे आश्वासन देऊन लोकार्पण सोहळा उरकून घेण्यात आला. नामकरण लढ्यासाठी एकदा गुन्हा दाखला झाला तरी त्याची तयारी आहे.
- मनोज डोंगरे, भूमिपुत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com