यंदाच्या दिवाळीत झळकणार ‘मॅजिक पणती’
यंदाच्या दिवाळीत झळकणार ‘मॅजिक पणती’
पनवेल बाजारपेठेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवीन पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, पनवेल शहरातील बाजारपेठा सध्या दिव्यांच्या झगमगाटाने उजळल्या आहेत. घराघरात प्रकाशाचा सण साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात खरेदीला लागले आहेत. यंदा पनवेल बाजारात तब्बल ८० प्रकारच्या पणत्या विक्रीसाठी आल्या असून, त्यामधील ‘मॅजिक पणती’ने नावीन्यपूर्ण आकर्षणाने ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
चायना बनावटीच्या विद्युत पणत्यांनी बाजारात प्रवेश केला आहे. पूर्वी ठरावीक डिझाइनच्या पणत्या विक्रीस येत असल्या, तरी आता त्यामध्ये आधुनिकता आणि कलात्मकतेचा स्पर्श दिसून येत आहे. बाजारात दीपमाळ, कमळ, हत्ती, कलश सेट, पान, फूल, घर आणि ‘जादूई दिवा’ अशा विविध आकारांच्या पणत्या आकर्षण ठरत आहेत. विशेष म्हणजे मोडी लिपीचा वापर करून ‘शुभ दिवाळी’ असा संदेश देणाऱ्या पणत्यांनी इतिहास आणि परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या संकल्पनेमुळे संस्कृतीप्रेमी नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. कलाकार सरिता पाचपुते यांनी सांगितले, की पहिल्या वर्षी ५०, दुसऱ्या वर्षी १००, तर यंदा तब्बल २५०हून अधिक मोडी लिपीतील पणत्यांद्वारे ‘शुभ दिवाळी’चा संदेश दिला आहे. या पणत्यांना मुंबईतूनही चांगली मागणी आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासूनच अंगणात, खिडक्यांमध्ये आणि देव्हाऱ्यात या पणत्या लावल्याने घराघरात आनंद, प्रसन्नता आणि सकारात्मकता पसरते. मातीच्या पारंपरिक पणत्यांनादेखील मागणी असल्याचे दिसून येत आहे. मातीच्या पणत्यांचा मंद प्रकाश, त्यातून निर्माण होणारे प्रसन्न वातावरण आणि पारंपरिक दिवाळीचा सुगंध यामुळे आजही या पणत्या प्रत्येक घरात आपले स्थान टिकवून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.