‘अवतरण’ दिवाळी अंकाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘अवतरण’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Published on

‘अवतरण’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
युद्धाच्या भयावह परिस्थितीवर शांतीचा मार्ग उलगडून दाखवण्याचा प्रयत्न
मुंबई, ता. १४ : विविध पुरस्कारांचा मानकरी ठरत आलेल्या आणि चिकित्सक वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मुख्यमंत्र्यांनी अंकाचे आवर्जून कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले, युनिट व्यवस्थापक सुभाष जयस्वाल आणि सहाय्यक वृत्तसंपादक सुशील आंबेरकर या वेळी उपस्थित होते.
दरवर्षी समाजजीवनाला प्रभावित करणाऱ्या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा ‘अवतरण’चा यंदाचा दिवाळी अंक ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित आहे. युद्धाच्या भयावह परिस्थितीतही शांतीचा मार्ग उलगडून दाखवण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात जगभरात अनेक देशांमध्ये युद्धजन्य आणि संघर्षमय परिस्थिती होती. रशिया-युक्रेन आणि इस्राईल-हमास युद्धासह इतरही देशांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होता. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे तर भारत-पाकिस्तानमध्येही तणाव निर्माण झाला. युद्धामुळे यंदा जगभरात लाखो जीव गेले. अशा संघर्षमय परिस्थितीत जगात शांतता नांदावी म्हणून असंख्य हात प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘अवतरण’मध्ये विविध विषयांची मांडणी करण्यात आली आहे. देश-विदेशातील अभ्यासकांसह ज्येष्ठ विचारवंतांच्या लेखणीने अंक सजला आहे. मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी, निळू दामले, तिलक देवेशर, अनुराधा गोरे, जतीन देसाई, नयना वैद्य, ब्रिजेश सिंह, धनंजय कुलकर्णी, समीर पाटील, डॉ. मालिनी नायर, राजदीप सरदेसाई, किरण गोखले, डॉ. अमिताभ सिंग, पूनम शर्मा, संदीप वासलेकर, विनोद खंदारे आदींच्या अभ्यासपूर्ण लेखांची मेजवानी वाचकांना मिळणार आहे.

जगण्याचा नवा मंत्र
यंदाच्या अंकात दलाई लामा आणि जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असलेले मॅथ्यू रिकार्ड यांचा जगण्याचा एक नवा मंत्र वाचायला मिळतो. युद्धाचे आर्थिक, सामाजिक अन् राजकीय पडसाद, जागतिक पातळीवर युद्धाचे भूराजकीय परिणाम, एआयसारख्या तंत्रज्ञानामुळे युद्धाचे बदलेले स्वरूप आणि त्यातील गांभीर्य, जागतिक संघर्षाबाबत अमेरिकेची भूमिका, युद्धबंदीसाठी जगभरात सुरू असलेले प्रयत्न, युद्धपटांमधून दाखवण्यात आलेला शांतीचा मार्ग, युद्धकाळात प्रसारमाध्यमांची भूमिका आणि जबाबदारी इत्यादी नावाविध विषयांवर अंकात भाष्य करण्यात आले आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com