श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, खडकपाडा विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी

श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, खडकपाडा विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी

Published on

वाणी विद्याशाला हायस्कूलची विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी
कल्याण, ता. १५ : खडकपाडा येथील श्री वाणी विद्याशाला हायस्कूलने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका स्पर्धेत वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट केली. विशेष म्हणजे या पदक विजेत्यांपैकी अनेक खेळाडूंची थेट विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
तायक्वांदोमध्ये दक्ष पाठक आणि दीप दुगाडे यांनी सुवर्णपदक पटकावत विभागीय स्तरावर आपली जागा निश्चित केली. सानवी खाडे आणि शौर्य रुद्राक्ष यांनी रौप्य पदके जिंकली. बॉक्सिंगमध्ये प्रांजल पाटील हिने सुवर्णपदकासह विभागीय स्तरावर खेळण्याचा मान मिळवला आहे. वुशू खेळात श्लोक हिले आणि हर्ष माधवी यांनी सुवर्णपदक तर रुद्र दळवीने रौप्यपदक मिळवले. या तिघांचीही विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. कुस्तीत शिवराज पाटीलने रौप्य पदक जिंकले. जलतरण स्पर्धेत दर्श बिलोरिया याने रौप्य पदक जिंकून विभागीय स्तरासाठी निवड मिळवली. रोहन शेंडे (इपीमध्ये सुवर्ण, फॉइलमध्ये रौप्य) आणि मंदार शिंपी (फॉइलमध्ये सुवर्ण, इपीमध्ये रौप्य) यांसारख्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. बॅडमिंटनमध्ये कार्तिक धामपूरकर, अप्रमय देशपांडे, सक्षम मोहदीकर, वारेंन्या वडकर आणि तनिष्क खंदारे यांनी सुवर्णपदकासह विभागीय स्तरासाठी निवड मिळवली. कराटेमध्ये निधी पवार हिने सुवर्णपदक जिंकले, तर अर्णव यादव आणि वेदान्त पाटील यांनी रौप्य पदके मिळवली.
नेमबाजीत अथर्व माने याने ओपन एअर रायफलमध्ये सुवर्ण, तर दीक्षान्त चाणेने एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले. सर्वेश पवार पीप साईट एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले. किकबॉक्सिंगमध्ये श्लोक हिले याने सुवर्णपदकासह विभागीय स्तरासाठी निवड मिळवली, तर प्रांजल पाटीलने कांस्य पदक जिंकले. ॲथलेटिक्समध्ये आर्या वारे हिने शर्यतीत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्तरावर आपली जागा निश्चित केली. बुद्धिबळमध्ये मीत लाडे याने सुवर्णपदक तर अनुषा थरईलने कांस्यपदकासह विभागीय स्तरासाठी निवड मिळवली. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ईश्वरी पाटीलने सुवर्णपदक जिंकून विभागीय स्तरासाठी निवड मिळवली.
या खेळाडूंचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका अंजना रेड्डी, पर्यवेक्षक गजानन वाघ, क्रीडा शिक्षक अतिश ठाणगे, महेश पवार, सीमा बिरारी आणि वर्षा पद्मन यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com