महिलांनी पुढाकार घेऊन व्यवसाय करावा

महिलांनी पुढाकार घेऊन व्यवसाय करावा
Published on

महिलांनी पुढाकार घेऊन व्यवसाय करावा
प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांचे आवाहन
अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) : ग्रामसंघ, प्रभाग संघ आणि बचतगट हे केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता महिलांनी या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करावा, शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण करावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण पायाभूत उपजीविका अभियानाच्या (राजीविका) प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांनी केले.
सह्याद्री महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा थळ ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी (ता. १५) पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी मोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभाग संघाच्या सचिव वर्षा सुतार यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला, तर लिपिका पल्लवी पावशे यांनी आर्थिक प्रगती अहवाल वाचून दाखवला. माजी प्रभाग संघ अध्यक्षा श्रेया कुलकर्णी यांनी संघाच्या कार्यप्रगतीविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रभाग समन्वयक प्रेरणा म्हात्रे यांनी लिहिलेल्या “मी सह्याद्री महिला प्रभाग संघ बोलतोय” या लेखाचे वाचन ममता म्हात्रे यांनी प्रभावीपणे केले. प्रकल्प संचालक मोरे यांनी पुढे सांगितले की, “सह्याद्री महिला प्रभाग संघ हा जिल्ह्यातील आदर्श संघ असून, जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत त्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जाईल. महिलांनी शासनाच्या विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा आणि त्यातून स्वावलंबी उद्योजक म्हणून घडावे. या सभेत अलिबाग तालुक्यातून पायलट म्हणून निवड झालेल्या राजेश्वरी दत्तात्रय सगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील शिरीष पाटील, सिद्धेश राऊळ, सुजाता पाटील तसेच तालुका अभियान व्यवस्थापक रिद्धी आवले, रिया पाटील, रोशनी पिंगळे, उज्ज्वल सामाजिक संस्थेच्या संस्थापिका उज्ज्वला चौधरी आणि कृषी अधिकारी संतोष टकले हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com