महाराष्ट्र गतका संघाने पटकावले चार रजत, सहा कांस्यपदक

महाराष्ट्र गतका संघाने पटकावले चार रजत, सहा कांस्यपदक

Published on

राष्ट्रीय गतका स्पर्धेत महाराष्ट्र संघाची शानदार कामगिरी
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : गतका फेडरेशन ऑफ इंडियाने नवी दिल्ली येथे १० ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या नवव्या राष्ट्रीय गतका स्पर्धेत महाराष्ट्र गतका संघाने चमकदार कामगिरी करत एकूण दहा पदके पटकावली. यामध्ये चार रजत (रौप्य) पदके आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील २३ राज्यांतून १००० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. निहार घनसोलकर (ठाणे जिल्हा), विनय गोसावी (पुणे शहर), मानस शेवाळे, मयंक चव्हाण यांनी रौप्य पदक पटकावले. शुभ्रा चौधरी (पुणे ग्रामीण), मोक्षा गुंजाळ (पुणे ग्रामीण), श्रुती शेरकर शर्वरी तारू यांनी कास्य पदक पटाकवले. इंडिव्हिज्युअल सिंगल सोटी प्रकारात काव्या शेळके (पुणे शहर), श्रावणी चौधरी (पुणे ग्रामीण) यांनी कांस्य पदक पटकावले.
संघाचे व्यवस्थापक म्हणून स्मित चौधरी आणि मानसी पवार यांनी जबाबदारी सांभाळली, तर अथर्व नलावडे, धीरज कोट, मंथन पवार, रवींद्र बनगया, श्रीधर कमले आणि कोमल शिंदे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. दिल्ली येथील स्पर्धेमध्ये असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्राचे सचिव प्राध्यापक आरती चौधरी यांनी संपूर्ण महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आणि पदक जिंकण्यासाठी खेळाडूंचा उत्साह वाढवला.या यशाबद्दल असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष अश्विनी महांगडे, खजिनदार ॲड. सायली जाधव आणि सर्व सदस्यांनी संघाचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com