मुरबाड बाजारपेठेत करवंदे दाखल

मुरबाड बाजारपेठेत करवंदे दाखल

Published on

मुरबाडच्या बाजारपेठेत दिवाळीची लगबग
करवंदे, कोंदी आणि रताळ्यांना मागणी; १०० रुपयांना सव्वाकिलोचा भाव
मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : दिवाळी सण अगदी चार-पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने मुरबाड तालुक्यात, ग्रामीण भागात आणि शहरी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. दिवाळीच्या फराळाची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेल्या खास पदार्थांनी बाजारपेठ गजबजली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात करवंदे, कोंदी, रताळी आणि चवळीच्या शेंगांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला चांगली जीवनसत्त्वे मिळतात, असा समज असल्याने ग्राहक या आरोग्यदायी फराळाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.
करवंदे, कोंदी आणि रताळी घेण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यंदा बाजारात करवंदे १०० रुपये सव्वाकिलो भावाने विकली जात आहेत. त्याचप्रमाणे कोंदी आणि रताळी यांचा भावही १०० रुपये सव्वाकिलो असा आहे. करवंदे, कोंदी आणि रताळी विकणाऱ्या महिलांनी ही माहिती दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर या खास पदार्थांमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com