रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप
विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरारमधील रिक्षाचालकांची मनमानी मोडून काढण्यासाठी, तसेच प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीला चाप लावण्यासाठी आता शहरात मीटर रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरपासून मीटर रिक्षा सुरू करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चारही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. रिक्षांचे परवाने खुले झाल्यापासून रिक्षाचालकांच्या संख्येत अजून भर पडली आहे, पण याचबरोबर रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मुजोरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही रिक्षाचालक हे बेकायदा वाहने चालवत असल्याचे प्रकार घडत आहे.
मुख्य रस्ते, रेल्वेस्थानक परिसर, रहदारीची सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याशिवाय अतिरिक्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे.
वसई-विरारमध्ये मीटर रिक्षा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून पुढे आली होती. याबाबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी पाठपुरावा सुरू केला होता. नुकतीच मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी आमदार स्नेहा दुबे-पंडित, महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त परिवहन अधिकारी भरत कळसकर, एमएसआरटीसीचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी सोनाली सोनार, पोलिस उपायुक्त अशोक वीरकर यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी वसई-विरार शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून मीटर रिक्षा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मीटर रिक्षा सुरू होणार असल्याने रिक्षाचालकांच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे.
बेकायदा वाहतूक
प्रशासनाच्या नियमानुसार तीन प्रवासी आणि एक रिक्षाचालक असे एकूण चार व्यक्ती रिक्षातून प्रवास करू शकतात, मात्र रिक्षामध्ये तीनऐवजी चार ते पाच प्रवासी भरले जात असतात. त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसतो, तर दुसरीकडे अपघात होण्याचा ही धोका निर्माण झाला आहे.
अंतर (किमी) दिवसा भाडे मध्यरात्रीनंतर भाडे
दीड २६ २९
४.१० ७० ८८
६.७० ११५ १४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.