एआय तंत्रज्ञानावर परवडणारे कर्करोग उपचार
एआय तंत्रज्ञानावर परवडणारे कर्करोग उपचार
‘नाव्या केअर’ची मोहीम, देशभरातील तज्ज्ञांचे उपचार ग्रामीण भागापर्यंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः देशभरातील प्रादेशिक कर्करोग रुग्णालयांशी हातमिळवणी करून ‘नाव्या केअर’ या संस्थेने कर्करोग उपचार क्षेत्रात मोठी झेप घेतली असून आधारित ‘अर्थशॉट’ उपक्रमातून एआय तंत्रज्ञानावर परवडणारे कर्करोग उपचार सुरू केले आहेत. देशात कुठेही राहणारा रुग्ण असला तरी प्रत्येक रुग्णाला टाटा मेमोरियल सेंटरसारख्या दर्जेदार उपचार सुविधा मिळाव्यात, हे नाव्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी ‘नाव्या अर्थशॉट’ नावाची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली डॉक्टरांना नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णाच्या आजारानुसार वैयक्तिकृत उपचार करते. ही प्रणाली सध्या तमिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम येथे कार्यरत असून आता महाराष्ट्रात लागू होत आहे. अवघ्या दोन महिन्यांत या उपक्रमातून १,००० हून अधिक अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना लाभ झाला आहे. वर्षाअखेरपर्यंत ३,००० रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नव्याचे तज्ज्ञ उपचार मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आहे. पात्र रुग्णांनी संपर्क साधावा किंवा www.navya.care या संकेतस्थळावर नोंदणी करा व संपर्क करता येईल.
दरम्यान, कर्करोगावर ही प्रणाली क्रांतिकारक ठरणार असून स्थानिक रुग्णालयांपर्यंत पोहोचवून उपचाराची प्रतीक्षा, प्रवास आणि आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी करता येण्याची शक्यता नव्या केअर सहसंस्थापक डॉ. नरेश रमराजन यांनी सांगितले. तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या माध्यमातून नव्या केअर आता समान, परवडणारे कर्करोग उपचार सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
महाराष्ट्रात १.२ लाखांहून अधिक नोंद
‘नाव्या’च्या अभ्यासानुसार उपचार निर्णय घेण्याचा वेळ ३१ टक्क्यांनी कमी झाला, रुग्णालय भेटी जवळपास अर्ध्या झाल्याने प्रवासखर्च आणि मानसिक ताण कमी झाला. आयसीएमआर आकडेवारीनुसार, दरवर्षी भारतात सुमारे १४ लाख नवीन कर्करोग रुग्ण नोंदवले जातात. महाराष्ट्रातच हे प्रमाण १.२ लाखांहून अधिक आहे. ग्रामीण भागातील बहुतेक रुग्णांना तज्ज्ञ उपचार केंद्रांपासून दूर राहावे लागते, अशा स्थितीत नाव्या केअरचे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे.
मोफत उपचार
रेशन कार्ड, बीपीएल कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र (२.५ लाख रु. खाली) किंवा सरकारी रुग्णालयातील प्रवेशपत्र असलेल्या रुग्णांना सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.