दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या
वसई, ता. १६ (बातमीदार) : दिव्यांचा सण दिवाळी सुरू होण्यासाठी काही तासांचाच वेळ शिल्लक आहे. खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळली आहेत. आकर्षक वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. वसई-विरार शहरात आकाशकंदील, रोषणाई दिवे, रांगोळी, पणत्या, रंग यासह विविधरंगी सजावटीच्या वस्तू बाजारात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.
कपडे, वाहने, विद्युत उपकरणे, घरगुती साहित्य तसेच विविध सामान बाजारात आले आहे. दीपावलीच्या शुभेच्छा देणारे फलकदेखील दुकानासमोर लावून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही दुकानदार खरेदीवर विशेष सवलत देत असल्याने ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. काही जण दुकानात जाण्यापेक्षा ऑनलाइन खरेदीला पसंती देत आहेत. एकमेकांना भेटवस्तू देण्यासाठीदेखील खरेदी केली जात आहे. दिवाळी सणाला येणाऱ्या ग्राहकाला वस्तू आवडावी व त्यांनी ती खरेदी करावी, यासाठी बाजापेठेत स्पर्धा दिसून येणार आहे. काही नागरिकांनी आतापासूनच खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. विद्युत रोषणाई, पणत्या व रांगोळीचे विविध रंग खरेदी करण्यावर भर दिला आहे. दिवाळी सण आनंदात साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. नोकरदारवर्गाच्या हाती दिवाळीचा बोनस आला असल्याने कुटुंबासह खरेदीचा उत्साह दिसून येणार आहे.
नवीन कपडे खरेदीचा उत्साह
दिवाळीदरम्यान नवीन कपडे परिधान करता यावीत, म्हणून नागरिक दुकानात जात आहेत. यासाठी एकावर एक मोफत ते कपड्यांवर सवलतदेखील दिल्या जात आहेत. त्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात कपड्यांची साठवणूक केली आहे.
फराळाची तयारी
कुरकुरीत, खमंग असा दिवाळी फराळ चाखता यावा, यासाठी महिलांनी घरी फराळ तयार करण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी ऑनलाइनचा आधार घेतला आहे. महिलांकडून विक्रीसाठी करंजी, चकली, लाडू, चिवडा तयार केला जात असल्याने त्यांना आर्थिक फायदा दिवाळी गोड करणार आहे.
सजावटीच्या वस्तू किंमत (रुपयांत)
आकाशकंदील (छोटे) २० ते ४०
आकाशकंदील (मोठे) १५० ते ८००
पणत्या (एक डझन) १००
नक्षीदार पणती (एक नग) ५०
रोषणाई दिवे माळ १५० ते ८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.