अंबरनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण पुढे ढकलले

अंबरनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण पुढे ढकलले

Published on

अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहराला मिळणाऱ्या सांस्कृतिक भेटीचे म्हणजेच नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक नाट्यगृहाचे लोकार्पण समारंभ पुढे ढकलण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने तातडीची सूचना जारी करत हा निर्णय जाहीर केला.
मूळ नियोजनानुसार हे नाट्यगृह रविवारी (ता. १९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन होणार होते. मात्र उद्‍घाटनाच्या काही दिवस आधीच ही तारीख रद्द करण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार महेश कोठारे, महेश मांजरेकर, उषा नाडकर्णी, अलका कुबल आदींची उपस्थिती निश्चित झाली होती. तसेच, १९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ‘सही रे सही’सह आठ नाटकांचे विशेष प्रयोग आयोजित करण्यात येणार होते. मात्र, तारखेत झालेल्या अचानक बदलामुळे हे सर्व कार्यक्रमही पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. या बदलामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक माहितीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.
सुमारे ६५८ आसन क्षमतेचे हे नाट्यगृह अंबरनाथच्या सांस्कृतिक जीवनासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्थानिक कलाकार, नाट्यप्रेमी आणि नागरिक या नाट्यगृहाच्या उद्‍घाटनाची आतुरतेने वाट पाहत होते. उद्‍घाटन पुढे ढकलल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असली तरी, अधिक आकर्षक पद्धतीने कार्यक्रम होईल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com