आधी पाणी द्या, तोपर्यंत बांधकामांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका

आधी पाणी द्या, तोपर्यंत बांधकामांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका

Published on

मगच बांधकामांना सीसी-ओसी मंजुरी द्या
पाणीटंचाईवरून आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : सिडको वसाहतींमध्ये (पनवेल, खारघर, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा) निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना कम्प्लिशन सर्टिफिकेट (सीसी) आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) मंजुरी देऊ नये तसेच नवीन भूखंड वाटप थांबवावे, अशी पुनर्मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पाण्यासंदर्भात अशीच स्थिती राहिली तर लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व नागरिकांना घेऊन सिडकोविरोधात तीव्र जनआंदोलन उभारीन, असा इशाराही प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.
प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात निवेदनही दिले आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे सणासुदीच्या काळातही नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. तसेच पाण्याचे टँकर वाटपही मनमानी पद्धतीने होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सिडको ‘शहरांचे शिल्पकार’ म्हणवून घेत असताना नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था स्वयंचलित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली असून, पाणीपुरवठा विभागातील निष्काळजी व बेशिस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल याची खातरजमा करावी, असेही त्यांनी निवेदनातून अधोरेखित केले आहे.

...तर सिडको कार्यालयाला टाळे ठोकणार
पाणीपुरवठा सुधारण्याकरिता, त्यात वाढ करण्याकरिता तसेच त्यामधील अनियमितता कमी करण्याकरिता मी सिडको प्रशासनाला अनेक सूचना केल्या आहेत; परंतु त्यावर अंमलबजावणी होत नाही. या गंभीर प्रश्नावर तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा नियमित न केल्यास नागरिकांना सोबत घेऊन सिडकोविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा आणि वेळप्रसंगी सिडको कार्यालयाला टाळे लावण्याचा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. त्यांनी निष्काळजी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com