मुंबई
दिवाळीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
दिवाळीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीनिमित्त विभागातील नागरिकांना भेटवस्तूंचे वाटप केले जाते. यावर्षीदेखील लांडे यांच्यामार्फत चांदिवली विधानसभा क्षेत्रातील २७ हजार नागरिकांना मोफत रवा, मैदा, साखर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. आमदार दिलीप लांडे म्हणाले, की शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात येताे. माझ्या विभागातील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा यामागे उद्देश असतो.