भाऊबीजेसाठी जादा एसटी गाड्यांचे नियोजन

भाऊबीजेसाठी जादा एसटी गाड्यांचे नियोजन

Published on

भाऊबीजेसाठी जादा एसटी गाड्यांचे नियोजन
कल्याण-विठ्ठलवाडी आगार सज्ज
संतोष दिवाडकर : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १९ : दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगार प्रशासनाने जादा एसटी गाड्यांचे विशेष नियोजन केले आहे. कोकण, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हे नियोजन करण्यात आले आहे. आगारप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत प्रवासीसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने रोजच्या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. गर्दी नियंत्रणासाठी कर्मचारीवर्गालाही विशेष ड्युटीवर तैनात करण्यात आले आहे.

आगार प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत प्रवासीसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने रोजच्या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. गर्दी नियंत्रणासाठी कर्मचारीवर्गालाही विशेष ड्युटीवर तैनात करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी आगारातून अहिल्यानगर, चिपळूण, दापोली या मार्गांवर जादा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. टिकीट आरक्षण ऑनलाइन तसेच आगारातील खिडक्यांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी आगारातून अहिल्यानगर, चिपळूण, दापोली या महत्त्वाच्या मार्गांवर जादा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की नागरिकांच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचारी आणि चालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाऊबीजच्या दिवशीही आवश्यकतेनुसार अतिरिक्त गाड्या चालवून सर्व प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचण्याची सुविधा मिळेल, अशी माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली.

आरक्षण आणि सुविधा
तिकीट आरक्षण ऑनलाइन तसेच आगारातील खिडक्यांवर सुलभरीत्या उपलब्ध आहे. प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाऊबीजच्या दिवशीही आवश्यकतेनुसार अतिरिक्त गाड्या चालवून सर्व प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचण्याची सुविधा मिळेल, अशी माहिती आगार प्रशासनाने दिली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ऑनलाइन तिकीट आरक्षण आणि मोबाइल ॲप सेवा अधिक सोयीस्कर केली असून, प्रवाशांनी या डिजिटल सेवेचाही लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुखांनी केले आहे.

अक्कलकोट एसटी आता नियमित
प्रवाशांच्या मागणीनुसार प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली विठ्ठलवाडी-अक्कलकोट ही एसटी सेवा प्रवाशांचा प्रतिसाद पाहता आता दररोज नियमित स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्णय विठ्ठलवाडी आगाराने घेतला आहे. याही एसटीचे आरक्षण ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे.

विठ्ठलवाडी आगारातून जादा फेऱ्या
विठ्ठलवाडी - दिवेआगार (स. ६ वा.)
विठ्ठलवाडी - अहिल्यानगर (स. ६ वा. आणि स. ६:३० वा.)
विठ्ठलवाडी - चिपळूण (सायं. ७ वा.)
विठ्ठलवाडी - दापोली (रा. ९:२५ वा.)

कल्याण आगाराच्या जादा फेऱ्या
कल्याण - आजरा (सायं. ७:३० वा.)
कल्याण - वडूज (सायं. ७ वा.)
कल्याण - कराड (स. ८ वा.)
कल्याण - बामणोली (स. ९ वा.)
कल्याण - श्रीरामपूर (स. ७:३० वा.)
कल्याण - साकोरी (स. ६ वा.)
कल्याण - परळी (स. ८ वा.)
कल्याण - तुळजापूर (स. १० वा.)
कल्याण - धुळे (दु. १:३० वा.)
कल्याण - अलिबाग (स. ७ वा. आणि स. ८ वा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com