वाचन प्रेरणा दिन साजरा
वाचन प्रेरणादिन साजरा
मुलुंड, ता. २० (बातमीदार) ः मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुलुंड विभाग यांच्या वतीने वाचन प्रेरणादिनाचे आयोजन केले होते. भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विजय शेटे यांचा उत्कृष्ट वाचक म्हणून ग्रंथालयाच्या कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी गुलाबपुष्प व एक ग्रंथ भेट देऊन गौरव केला. तसेच अवंती महाजन यांनी वर्ष २०२४ मधील प्रकाशित झालेल्या निवडक दिवाळी अंकांतील साहित्याचे संकलन म्हणजेच ‘अभिजात अक्षरे’ याचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महेश ठाकूर यांनी ग्रंथालयाला एक गार्डन बेंच देणगी स्वरूपात दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. त्यानंतर सहभागी सभासदांनी आपल्या आवडीचे साहित्य सादर केले. प्रा. डॉ. भारती निरगुडकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कवटकर कार्यकारीणी सदस्य तसेच ग्रंथालय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन हेमांगी गायकवाड यांनी केले.