मुंबई
किरकोळ वादातून चाकूने भोसकले
किरकोळ वादातून चाकूने भोसकले
नवीन पनवेल, ता.२० (बातमीदार)ः डिपॉझिट परत देण्याच्या वादातून चाकून भोसकल्याची घटना पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी गोविंद राठोड यांना आरोपी आनंद जाधवला २ लाखांच्या हेवी डिपॉझिटवर सदनिका भाडेतत्त्वावर दिली होती. यावेळी आरोपी आनंद यांचा सोसायटीमधील सदस्यांशी वाद झाल्याने गोविंद राठोड यांना दिलेले पैसे परत मागितले. वडाळे तलाव परिसरामध्ये यावरून दोघांमध्ये शिवीगाळ झाली. तर आरोपीने चाकु फिर्यादीच्या पोटामध्ये घुसवली. गोविंद यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून आरोपीविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.