पनवेल महावितरणचा दिवाळी सणासाठी सुरक्षिततेचा आवाहन
पनवेल महावितरणचा दिवाळी सणासाठी सुरक्षिततेचे आवाहन
नवीन पनवेल, ता. १९ (बातमीदार) : दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात आनंद आणि प्रकाश घेऊन येतो. याचबरोबर या सणाशी निगडित दुदैर्वी घटना आणि अपघातही दरवर्षी घडत असतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महावितरणने नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पनवेल महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी फटाके, रोषणाई व विद्युत उपकरणे वापरताना खबरदारी घेण्याची विशेष सूचना केली आहे.
महावितरणने सांगितले, की दिवाळीच्या दिवशी फटाके, रोषणाई आणि घरातील सजावटीच्या दिव्यांमुळे दरवर्षी आगीच्या घटनांमध्ये वाढ होते. अशा घटनांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर जीवितहानीदेखील मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. महावितरणने काही महत्त्वाचे नियम नागरिकांसमोर ठेवले आहेत. घरातील सजावटीच्या दिव्यांना मोकळ्या जागेतच लावावे. पडदे, बिछाना, कपडे यापासून दिवे दूर ठेवावेत. लहान मुले आणि पाळीव प्राणी दिव्यांच्या जवळ ठेवू नयेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेली सॉकेट्स किंवा वीजतारा वापरू नयेत, तसेच जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपचा वापर करावा. घरात कुणी नसल्यास सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
...........
काळजी घ्या, सुरक्षित राहा
फटाके उडविताना मोकळ्या जागेतच फटाके फोडावेत. विजेच्या उपकरणांजवळ, विद्युत खांबांच्या जवळ किंवा सॉकेट्सवर फटाके ठेवू नयेत. रोषणाईसाठी वापरलेले विद्युत दिवे, त्यांचे तारे व सॉकेट्स यांची काळजीपूर्वक तपासणी करावी. आकाशकंदील व दिव्यांच्या माळा लावताना मुख्य प्लगवर थ्री पिन जोडणी करणे आवश्यक आहे. वायर्स भिंतीवर क्लिप्सच्या मदतीने सरळ रेषेत असाव्यात. अनेकदा थ्री पिन न वापरता वायर्स डायरेक्ट प्लगमध्ये बसवल्यामुळे स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. महावितरणने नागरिकांना सांगितले, की एकाच प्लगमध्ये अनेक उपकरणे जोडल्याने विजेचा भार वाढतो. यामुळे अपघात होऊ शकतो. रोषणाई करताना वायरिंगमध्ये केलेले उघडे जोड स्पर्श झाल्यास प्राणघातक अपघात होऊ शकतो. बाल्कनीच्या ग्रीलला वायरिंग लावणे किंवा सेलोटेपने जोडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्व जोड व्यवस्थित अर्थिंग केले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.