कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

१६३ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची शिकवणूक जीवनात उतरवत मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेचा हृदयस्पर्शी आदर्श प्रस्तुत करत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून शहापूर आणि घाटकोपर येथे ऐन दिवाळीत रविवारी आयोजित केलेल्या दोन रक्तदान शिबिरांमध्ये १६३ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
संत निरंकारी सत्संग भवन, शहापूर (जि. ठाणे) या आदविासी भागामध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकंदर ९८ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. ज्यामध्ये ८६ पुरुष व १२ महिला रक्तदात्यांचा समावेश होता. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढी व जे. जे. महानगर रक्तपेढी यांचेकडून रक्त संकलन करण्यात आले. मिशनच्या शहापूर, कसारा व वासिंद शाखांमधील निरंकारी भक्तांनी या शिबिरात भाग घेतला. संत निरंकारी मंडळाच्या कल्याण विभागाचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या उपस्थितित प्रभुनामाचे स्मरण करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराला अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना श्हापूर तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे शिवसेना तालुका संपर्कप्रमुख अरुण कासारे यांच्यासह सामाजिक एवं राजकीय क्षेत्राामध्ये कार्य करणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश होता. सर्व मान्यवर व्यक्तींनी मिशनच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली. स्थानिक मुखी शैलेश सपकाळे तसेच अन्य शाखांचे मुखी व प्रबंधक यांच्या देखरेखीखाली सेवादल व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरीत्या राबविण्यात आले. तर शिवाजी हॉल, घाटकोपर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मिशनच्या पंतनगर व विद्याविहार या दोन शाखांमधील निरंकारी श्रद्धाळू भक्तांनी भाग घेतला आणि एकंदर ६५ जणांनी रक्तदान केले. या शिबिराला अनेक मान्यवर व्यक्तींनी सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये मुख्यत: माजी नगरसेवक परमेश्वर कदम आणि प्रवीण छेडा यांचा समावेश होता. याप्रसंगी मान्यवरांनी मिशनच्या निष्काम भावनेने केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक सेवांचे कौतुक केले. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक प्रकाश जोशी यांनी शिबिरामध्ये उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले मार्फत या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यात आले. पंतनगर ब्रांच मुखी प्रभा सावर्डेकर व विद्याविहार ब्रांच मुखी जयबीर सिंह यांनी सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com