औषध उद्योगाला चालना
औषध उद्योगाला चालना
दिघी बंदरातील फार्मा पार्कसाठीची निविदा मंजूर
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यातील फार्मा पार्क विकसित करण्यासाठी खासगी विकसकाची महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने नेमणूक केली आहे. त्यामुळे दिघी बंदराच्या विकासाला चालना मिळाली असून, औषध उद्योगाला चालना मिळाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरूड परिसरात बल्क ड्रग पार्क व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र केंद्र सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रासाठी रोहा, माणगाव तालुक्यातील ६४६२.१२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. यापैकी ३९२२.७७ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीमार्फत विकसित करण्यात येत आहे. दिघी बंदर औद्योगिक विकास क्षेत्रात बल्क ड्रग पार्क उभारण्याचा निर्णय मार्च २०२३ मध्ये राज्य सरकारने घेतला. यासाठी जमीन निश्चितीचे कामही गेल्या दीड वर्षांपासून सुरू होते. देशांतर्गत औषध उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने चार मोठे बल्क ड्रग पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता. एमआयडीसीने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिघी बंदराभिमुख औद्योगिक क्षेत्रात हायटेक फार्मा पार्क विकसित करण्याचा निर्णय मंजूर केला होता. यासाठी व्यवहार सल्लागार नेमून निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दिघी बंदराभिमुख औद्योगिक क्षेत्रात हजार हेक्टर क्षेत्रात आरक्षित झाले. अखेर मे. रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांची ७१३.४२ कोटींची रकमेची निविदा प्राप्त झाली.
---------------------------------------
एक लाख रोजगारनिर्मिती
- मे २०२५ मध्ये एमआयडीसीच्या तिसऱ्या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला आहे. या प्रक्रियेत रामके इन्फ्राट्रक्चर लिमिटेड, रामक्रिशी इन्फ्राट्रक्चर प्रायव्हेट लिम्टेड आणि ब्रीज गोपाल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या, तर जमिनीची अपेक्षित किंमत ७१० कोटी रुपये ठरवली आहे.
- रायगड जिल्ह्यातील माणगाव, रोहा, मुरूड तालुक्यातील आगरदांडा, म्हसळा तालुक्यात केंद्राने ५,४६९ कोटी दिले आहेत. या प्रकल्पाची गुंतवणूक क्षमता तब्बल ३८ हजार कोटींची आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून एक लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार स्थानिकांना मिळणार आहे.
---------------------------------------
२२ गावांचा विकास
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र होणार असले. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगावमधील जवळपास नऊ गावांचा समावेश होणार आहे. नऊ गावांचा विकास एमआयसीडीसी करणार असून, १३ गावांचा विकास एमआयडीसी करणार आहे. संपादित झालेल्या क्षेत्रात ६१.९७ हेक्टरवर पादत्राणे आणि चर्मोद्योग क्लस्टर प्रकल्पाची एक हजार हेक्टरवर बल्क ड्रग पार्कची उभारणी होणार आहे, तर उर्वरित दोन हजार ४६० हेक्टरवर केंद्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार आहे.
---------------------------------------
प्रकल्पाची माहिती
केंद्र ः ५,४६९ कोटी
संपादित क्षेत्र ः ६१.९७ हेक्टर
रोजगार ः एक लाख १४ हजार १८३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.