किल्ले साकारताना बच्चेकंपनीचा इतिहास अभ्यास
भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, रोषणाई आणि बालकांच्या कल्पकतेचा उत्सव! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेल्या भिवंडी शहरात दरवर्षी मुलांच्या हातून साकारले जाणारे मातीचे किल्ले हे या परंपरेचे जिवंत उदाहरण ठरले आहेत. कोंबडपाडा, संगमपाडा, अजयनगर आणि गोकुळनगर परिसरात दरवर्षी शेकडोच्या संख्येने किल्ले साकारले जात आहे. हे दृश्य शहरातील सांस्कृतिक ओळख बनले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी होणारे शहर शिवजयंती उत्सवाचे कार्यक्रम या परिसरातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. याच प्रभावामुळे बालकांमध्ये शिवकालीन किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. २० वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणावर किल्ले उभारले जात आहेत. या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी समाजसेवकांनी स्थानिक स्तरावर स्पर्धा सुरू केल्या. या स्पर्धेमध्ये दरवर्षी सुमारे २००हून अधिक स्पर्धक सहभागी होतात. शहरातील इतर स्पर्धकांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे, अशी माहिती स्पर्धेचे जुने परीक्षक राजू घैसास यांनी दिली. स्पर्धेच्या निमित्ताने मुले फक्त किल्ले बनवत नाहीत, तर इतिहासाचा अभ्यासही करतात, असे ते म्हणाले.
अभ्यासातून साकारतो ‘किल्ला’
किल्ला बनविण्यापूर्वी बच्चेकंपनी प्रथम संबंधित किल्ल्याचा इतिहास, रचना आणि वैशिष्ट्यांचा संगणकावर अभ्यास करते. त्यानंतर माती, दगड, लाकूड आणि इतर साहित्य गोळा करून प्रत्यक्ष किल्ला साकारतात. या प्रक्रियेतून त्यांना मावळ्यांनी किल्ले उभारताना घेतलेली मेहनत आणि कल्पकता अनुभवास येते.
समाज आणि पालकांचा पाठिंबा
किल्ला उपक्रमाला स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो. त्यामुळे दरवर्षी मुलांनी बनविलेल्या किल्ल्यांची संख्या वाढत आहे. या माध्यमातून मुलांच्या कल्पकतेबरोबरच शिवकालीन इतिहास आणि देशभक्तीचे संस्कार जोपासले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.