फटाका प्रदूषणामुळे ठाणे डेंजर झोमध्ये
ठाण्यात प्रदूषणाचा उच्चांक
श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता
ठाणे शहर, ता. २१: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाणे शहराच्या हवेचे प्रदूषण एका झटक्यात ‘सेफ झोन’मधून ‘डेंजर झोन’मध्ये पोहोचले आहे. ठाणेकरांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे, जे प्रदूषण पूर्वी केवळ ८५ एक्यूआय होते, ते थेट २१३ वर पोहोचले. हरित फटाके फोडण्याचे आवाहन करूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धूर पसरवणारे फटाके फोडल्याने ठाण्यात श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फटाक्यांमुळे केवळ ठाणेच नाही, तर कल्याण, उल्हासनगर, भाईंदर, नवी मुंबई आणि मुंबई शहरांनीही प्रदूषण वाढवण्यास हातभार लावला. यामध्ये मुंबई हे शहर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित ठरले. मुंबईमध्ये एका दिवसात तब्बल ३५५ एक्यूआय प्रदूषित हवेची नोंद झाली.
दिवाळीचा सण फटाक्यांच्या आवाजाशिवाय साजरा झाल्यासारखा वाटत नाही. याच उत्साहात ठाण्यात दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. १९ ऑक्टोबर रोजी ठाण्याची हवा ‘ग्रीन झोन’मध्ये ८५ एक्यूआय होती, ती एकाच दिवसात प्रदूषित होऊन २१३ एक्यूआयवर पोहोचली. ठाणेकरांनी सायंकाळी ७ ते १० या वेळेत सर्वाधिक फटाके फोडले. परिणामी, ‘समाधानकारक’ गटात असलेली हवा आता ‘धोकादायक’ गटात आली आहे.
या वाढलेल्या प्रदूषणामुळे दमा, हृदयविकार आणि फुफ्फुसाचे संक्रमण (संसर्ग) असलेल्या बाधितांना मोठा त्रास सहन करावा लागला. इतकेच नव्हे, तर अचानक वाढलेल्या या प्रदूषणामुळे श्वसनाचे नवे रुग्ण निर्माण होण्याची भीती आरोग्य क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बसविण्यात आलेल्या प्रदूषण मापक केंद्रांच्या आकडेवारीनुसार, फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरांनुसार प्रदूषणाची स्थिती
शहर हवेची गुणवत्ता
मुंबई ३५५ (राज्यात सर्वाधिक)
नवी मुंबई २४६
कल्याण २३५
भाईंदर २२६
ठाणे २१३
तळोजा २१२
विरार २११
उल्हासनगर १७६
बोईसर १४१
बदलापूर १३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.