वसई-विरार शहरात राजकीय दिवाळी

वसई-विरार शहरात राजकीय दिवाळी

Published on

वसई, ता. २१ (बातमीदार) : पाच वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे पक्ष आणि मतदार प्रतीक्षा करत असताना निवडणुकीचे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यातच दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी राजकीय फलक झळकू लागले आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर हरकती, सूचनांचे काम पूर्ण होऊन सुनावणी घेण्यात आली व अंतिम प्रभागरचना घोषित केली आहे. आता दिवाळीचा उत्साह सुरू झाला आहे. सुट्टीचा आनंद नागरिक घेत आहेत, तसेच दिवाळी पहाट, दिवाळी संध्या व विविध कार्यक्रम राबवले जात आहेत, परंतु आता निवडणूक जवळ येत असल्याने सणाची संधी हातातून जाऊ नये, यासाठी पक्षीय स्पर्धा सुरू झाली आहे.

वसई-विरार महापालिकेत बविआची एकहाती सत्ता राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत बोईसर मतदारसंघ शिवसेना, तर नालासोपारा आणि वसई मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे. त्यामुळे भाजप संघटना वाढीकडे लक्ष देऊ लागली आहे, अशातच नाराज असलेले पक्ष बदलू लागले आहेत. दिवाळी सणात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर झळकू लागले आहेत. निवडणूक बहुजन विकास आघाडी व भाजप या दोन पक्षांत होणार आहे, अशी शक्यता सध्या दिसत आहे.

सणासुदीला मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी, नाराज कार्यकर्त्यांना गोंजारण्यासाठी व नवीन लोकांना जवळ करण्यासाठी त्यांचे छायाचित्रदेखील बॅनरवर लावण्यात येत आहेत. आता महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार आणि राजकीय बॉम्ब फुटणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

घरोघरी दिवाळी भेट, राजकीय फील
दिवाळीमध्ये फराळ, उटणे हे भेटवस्तू म्हणून देण्यासाठी अनेक प्रभागांत रेलचेल सुरू आहे. इच्छुक, तसेच माजी लोकप्रतिनिधी व पक्षांतील मंडळी दीपावलीच्या शुभेच्छा असलेले फलक जागोजागी लावून नागरिकांच्या घरी भेट देऊ लागले आहेत. त्यामुळे राजकीय दिवाळीचा फील नागरिकांना येऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com