लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी धो-धो पाऊस

लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी धो-धो पाऊस

Published on

लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी धो-धो पाऊस
कल्याण, ता. २१ (बातमीदार) ः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने ‘प्रकाशाचा सण’ काहीसा अंधारमय झाला. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी, संध्याकाळच्या वेळी आकाशात काळे ढग दाटून आले आणि त्यानंतर विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट तसेच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

वाऱ्याच्या झोतामुळे अनेकांच्या घराबाहेरील कंदील आणि रांगोळ्या उधळल्या गेल्या, तर पावसाच्या सततच्या सरींमुळे जमिनीवरच्या रांगोळ्या पुसल्या गेल्या. लक्ष्मीपूजनासाठी लावलेले दिवे आणि रोषणाईच्या माळा वाऱ्याने व पावसाने मालवल्या. काही भागांमध्ये खबरदारी म्हणून वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. त्यामुळे भक्तांना दिव्यांच्या मंद प्रकाशात पूजा उरकून घ्यावी लागली.

शहरात काही परिसरातील रस्ते चिखलमय झाल्यामुळे नागरिकांना पूजेसाठी घराबाहेर पडताना अडथळे आले. विशेष म्हणजे, स्थानिक बालकलाकारांनी मोठ्या मेहनतीने बनवलेल्या किल्ल्यांचे वादळी पावसामुळे नुकसान झाले. मातीचे किल्ले आणि सजावटीच्या वस्तू कोसळल्या, तसेच काही ठिकाणी रंगीत फलक व बॅनर वाऱ्यामुळे उडाले. फटाक्यांच्या आतषबाजीवरही पावसाने पाणी फेरले, त्यामुळे आनंदाचा माहोल काहीसा मावळला.

व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही या पावसाचा मोठा परिणाम जाणवला. दिवाळीच्या खरेदीसाठी असलेली संध्याकाळ अपेक्षित गर्दीशिवाय निस्तेज झाली. गोडधोड मिठाई, फटाके आणि सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीत घट झाली. अनेक दुकानदारांना आपले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी घाईघाईने धावपळ करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com