कामोठ्यात मायलेकींचा होरपळून मृत्यू

कामोठ्यात मायलेकींचा होरपळून मृत्यू

Published on

कामोठ्यात मायलेकींचा होरपळून मृत्यू

पनवेल, ता. २१ (वार्ताहर) : कामोठे सेक्टर-३६मधील अंबे श्रद्धा या निवासी इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागून आई आणि मुलीचा मृत्यू झाला. मृत आईचे नाव रेखा शिशोदिया आणि मुलीचे नाव पायल शिशोदिया (वय १७) असे होते. दोघी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहात होत्या. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही आग मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास लागली. इमारत कामोठे पोलिस ठाण्याच्या जवळच असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना या इमारतीत सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरला. सिलिंडरचा स्फोट होण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे संबंधित फ्लॅटमध्ये आग लागली असावी आणि त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृत मायलेकींचे मृतदेह बेडवरच आढळून आले असून, धुराचा प्रचंड त्रास होऊन त्या बेशुद्ध पडल्या असाव्यात, त्यानंतर सिलिंडरचा स्फोट होऊन त्या आगीमध्ये होरपळल्या असाव्यात, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या वेळी शिशोदिया कुटुंबातील इतर दोन सदस्य घराबाहेर कामानिमित्त गेले असल्याने त्यांचे प्राण वाचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कामोठे पोलिस आणि अग्निशमन विभाग संयुक्तरीत्या या आगीमागच्या कारणांचा शोध घेत आहेत. या वेळी घटनास्थळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे हजर होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com