सोमय्या विद्यापीठातील आयटीआयचा दीक्षांत सोहळा
सोमय्या विद्यापीठातील आयटीआयचा दीक्षान्त सोहळा
७७ जणांना पदवी प्रदान; राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड
मुंबई, ता. २३ ः रोजगारपूरक आणि कौशल्यपूर्ण असे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या विद्याविहार येथील के. जे. सोमय्या खासगी उद्योजकता प्रशिक्षण संस्थेचा २०२५चा दीक्षान्त सोहळा नुकताच पार पडला. यात ७७ विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांसाठी पदवी प्रदान करण्यात आली.
आयटीआयची पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३० जणांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीसाठी निवड झाली असल्याने त्यांचेही या सोहळ्यात कौतुक करण्यात आले. सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी प्राचार्य प्रा. शाजी मॅथ्यू यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सोमय्या विद्यापीठ आणि येथील शिक्षण संकुलाअंतर्गत येणाऱ्या या आयटीआयमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन, एअरकंडिशनिंग टेक्निशियन, वेल्डर, प्लंबर, सोलर, टेक्निशियन तसेच कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.
अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ७७ विद्यार्थ्यांपैकी विद्यापीठ संकुलात झालेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल ३० विद्यार्थ्यांची दुबई येथे निवड झाली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १० नामांकित कंपन्यांनी येथील विद्यार्थ्यांची निवड केली असून, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही रोजगाराची संधी मिळाली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू प्रा. राजशेखरन पिल्लई यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की शिक्षण आणि त्यातून मिळालेले ज्ञान पूर्ण होण्यासाठी कौशल्याची जोड आवश्यक असते. ते कौशल्य विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांतून मिळते. विद्यार्थ्यांना दुबईत मिळालेली रोजगार संधी हे त्याचे प्रतीक असल्याचे कुलगुरू प्रा. राजशेखरन पिल्लई यांनी सांगितले. तसेच प्राचार्य प्रा. शाजी मॅथ्यू यांनी संस्थेने केलेल्या कार्याची माहिती दिली.
असे मिळवले यश
ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (एआयटीटी)मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांमध्ये ईश्वर पटेल (९८.६६ टक्के - इलेक्ट्रिशियन), सागर पाटील (९८.५० टक्के - इलेक्ट्रिशियन) आणि सऊद बुरोंडकर (९७.१६ टक्के - आरएसीटी) यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय प्रकल्प प्रदर्शनात पोर्टेबल सॉ मशीन प्रकल्पासाठी तृतीय पारितोषिक मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.