सरकारी उदासीनतेचा पाणथळ जागांना फटका

सरकारी उदासीनतेचा पाणथळ जागांना फटका

Published on

सरकारी उदासीनतेचा पाणथळ जागांना फटका
९९.९ टक्के ठिकाणांवर संरक्षणाचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : इस्रोने मॅप केलेल्या दोन लाखांहून अधिक पाणथळ जागांपैकी फक्त १०२ पाणथळ जागांना सरकारने कायदेशीररीत्या संरक्षण दिले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने माहिती अधिकाराच्या कायद्यान्वये ही धक्कादायक कबुली दिली आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पर्यावरण निरीक्षक नॅटकनेक्ट फाउंडेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाणथळ जागांसाठी जलदगतीने कायदेशीर संरक्षण देण्याची सूचना केली होती. पूर नियंत्रित करणारे, भूजल पुनर्भरण करणारे आणि स्थलांतरित पक्ष्यांना आधार देणारी महत्त्वाची परिसंस्था म्हणून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाणथळ जागा विभागाने केंद्रीय पर्यावरण एक लाख ८९ हजार ६४४ पाणथळ जागा जमिनीवर पडताळण्यात आल्या आहेत. (भौतिकदृष्ट्या पडताळण्यात आल्या आहेत) आणि १,१६,४२५ सीमा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी निश्चित केल्या आहेत; परंतु आतापर्यंत फक्त १०२ पाणथळ जागा संरक्षणासाठी औपचारिकपणे अधिसूचित करण्यात आल्या आहेत. नॅटकनेक्ट या संस्थेने मागितलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. उर्वरित पाणथळ जागा पडताळण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाणथळ जागा शास्त्रज्ञ पंकज वर्मा यांनी नॅटकनेक्टला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की इतर पाणथळ जागा अधिसूचित करणे प्रगतिपथावर आहे आणि या प्रक्रियेवर मंत्रालयाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तथापि याबाबत पर्यावरण जाणकारांनी काळजी व्यक्त केली आहे. कारण अधिकृत अधिसूचनेच्या अनुपस्थितीत शहरी नियोजक पाणथळ जागांकडे दुर्लक्ष करीत आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नावाखाली पाणथळ जागा नष्ट केल्या जात आहेत, असे फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
...
फुप्फुसांना वाचवण्याचे आवाहन
पीएमओच्या सार्वजनिक तक्रार पोर्टलद्वारे दाखल केलेली कुमार यांची तक्रार आता औपचारिकपणे एमओईएफ अँड सीसीच्या वेटलँड्स विभागाकडे पाठवण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधानांना वैयक्तिकरीत्या हस्तक्षेप करून या फुप्फुसांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की त्यांनी पाणथळ जागांचे समग्र संवर्धन आणि पुनर्संचयनात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय जलीय परिसंस्थांच्या संवर्धन योजना (एनपीसीए) मार्गदर्शक तत्त्वे २०२४ तयार केली आहेत. या योजनेचा उद्देश एकात्मिक, बहुविद्याशाखीय दृष्टिकोनातून या महत्त्वपूर्ण परिसंस्थांचा ऱ्हास थांबवणे आहे.
...
पक्ष्यांसाठी अनुकूल शहरे
नॅटकनेक्टच्या आवाहनात संयुक्त राष्ट्रांनी चालवलेल्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (डब्ल्यूएमबीडी) २०२५च्या थीमचादेखील उल्लेख केला आहे. ‘सामायिक जागा : पक्षीअनुकूल शहरे आणि समुदाय तयार करणे’ या थीममध्ये स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण थांबे म्हणून काम करणाऱ्या पाणथळ जागांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
...
जैवविविधतेचे राजदूत
जलद शहरी विस्तार आणि काही मानवी कृत्यांमुळे पाणथळ जागांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असा इशारा देत नॅटकनेक्टने म्हटले आहे, की इस्रोने आधीच मॅप केलेल्या २.२५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सर्व दोन लाखांहून अधिक पाणथळ जागा काँक्रीटखाली गायब होण्यापूर्वी सरकारने त्यांची अधिसूचना जलद करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com