देशभरात दिवाळी-छठ पूजेसाठी १२ हजार विशेष गाड्या
दिवाळी-छठपूजेसाठी १२ हजार विशेष गाड्या
मुंबई विभागातून ६०० पेक्षा अधिक ट्रेन धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : दिवाळी आणि छठपूजेनिमित्त प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने देशभरात तब्बल १२ हजार ११ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे एक हजार ९९८ गाड्या मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणार असून, यात मुंबई विभागातून ६०० हून अधिक गाड्या सुटणार आहेत. यामध्ये सर्वाधिक गाड्या बिहार-उत्तर प्रदेशसाठी धावणार आहेत.
मुंबईतून दररोज शेकडो प्रवासी आपापल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वेचा आधार घेतात. नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज ८ ते १० विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षित पोहोचविण्यासाठी ९३ हजारांहून अधिक मध्य रेल्वे कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. मुंंबईतील सर्व मुख्य स्थानकांवर गर्दीमुळे गोंधळ उडू नये, यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सीएसएमटी (९०), एलटीटी (७०), दादर (४७) आणि कल्याण (६६) येथे अतिरिक्त आरपीएफ व जीआरपी कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिता मध्य रेल्वेने दिली आहे.
यूपी- बिहारला प्राधान्य
दरवर्षीप्रमाणे गाड्यांपैकी बहुतांश सेवा बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी देण्यात आली आहे. मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरून दररोज १५ हून अधिक विशेष गाड्या सुटत असून, २६ ऑक्टोबरला सर्वाधिक २४ गाड्या रवाना होतील. सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकांवरून दानापूर, मुझफ्फरपूर आणि गोरखपूर या गंतव्यांसाठी प्रत्येकी तीन विशेष गाड्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या सेवा बिहारकडे जाणाऱ्या नियमित २२ गाड्यांव्यतिरिक्त उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था
- रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुविधा
- सीएसएमटी स्थानकावर १,५०० प्रवासी थांबण्याची सोय
- एलटीटीवर १० हजारांहून अधिक प्रवासी थांबण्याची व्यवस्था
- गाड्यांच्या प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल होणार नाही
- बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी ६० सुरक्षा कर्मचारी तैनात
मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
एकूण नियोजित फेऱ्या - १,९९८
पूर्ण फेऱ्या - ७४०
प्रलंबित फेऱ्या - १,२५८
-------------
राज्यानुसार विशेष ट्रेनची संख्या
राज्य ट्रेन प्रवासी संख्या
बिहार ४६४ ७,२५,३९४
उत्तर प्रदेश ४७० ८,०३,८९८
महाराष्ट्र ५०५ ६,०४,६५१
राजस्थान ८८ १,६०,७४३
दिल्ली ९२ १,४२,७६९
-------------
या वेळी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त व्यवस्था केली आहे. दिवाळी, छठपूजेसाठी ९३ हजार कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. याशिवाय अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे.
डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

