आंबेकर श्रम गौरव पुरस्काराच्या प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

आंबेकर श्रम गौरव पुरस्काराच्या प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Published on

आंबेकर श्रम गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, ता.२३ : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने आद्य संस्थापक, कामगार महर्षी दिवंगत गं. द. आंबेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे कामगार चळवळ, सामाजिक, साहित्य, कला आणि क्रीडा या पाच विभागांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा ‘गं. द. आंबेकर श्रम गौरव पुरस्काराने’ गुणगौरव करण्याची घोषणा अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे. यासाठी औद्योगिक क्षेत्रात मोडणाऱ्या कामगारांनी त्यासाठी आपले लेखी प्रस्ताव अर्जासोबत येत्या ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पाठविण्याचे आवाहन समन्वयक काशिनाथ माटल यांनी केले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा गं. द. आंबेकर स्मृतिदिनी १३ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे असून‌, आंबेकर श्रम गौरव पुरस्कार विजेत्याला प्रत्येकी रोख ३५ हजार रुपयांचा धनादेश, तर जीवनगौरव‌ विजेत्याला रोख ५१ हजार रुपयांचा‌ धनादेश सोबत देऊन गुणगौरव करण्यात येणार असल्याची माहिती माटल यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com