जाहिरात मजकूर
जाहिरात मजकूर
----
मोतीलाल ओसवाल सदर
----
३६० वन डब्ल्यू.ए.एम. : लक्ष्य - १,४५०
३६० वन डब्ल्यू.ए.एम.ने या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अत्यंत चांगली कामगिरी केली असून, त्यांचा महसूल ७.६ अब्ज रुपयांवर गेला आहे. यातील वार्षिक वाढ ३०% आहे. त्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५.१ लाख कोटी रुपयांवर गेली असून, त्यातील वार्षिक वाढ २७% आहे. त्यांचा करोत्तर नफा ३.२ अब्ज रुपये झाला असून, त्यातील वार्षिक वाढ २७% आहे. यामुळे त्यांच्या व्यवसायातील सर्वंकष वाढ दिसून येते. कंपनीने संशोधन व्यवस्थापनासाठी नवा संघ उभारला असून, यू.बी.एस.बरोबर त्यांनी केलेली भागीदारी तसेच बी.अँड के.चे त्यांनी केलेले अधिग्रहण यामुळे त्यांच्या व्यवसायात मोठी प्रगती होत आहे. या घडामोडींमुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीत तसेच तेथे नवे ग्राहक मिळवण्यात आणि तेथील व्यवहारांमध्येही वाढ होत आहे. कामकाजातील लवचिकतेचे मिळणारे फायदे तसेच खर्च नियंत्रणासाठीचे संतुलित उपाय त्यामुळे त्यांची नफा क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ३६० वन यापुढेही सातत्यपूर्ण आणि मोठ्या प्रमाणावर संपत्तीत आणि संपत्ती व्यवस्थापन व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ दाखवण्यास सज्ज झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान कंपनीचा महसूल आणि करोत्तर नफा अनुक्रमे २० आणि २२ टक्के चक्रवाढ दराने वाढण्याचा अंदाज आहे. वार्षिक आवर्ती महसूल आणि व्यवसायातून मिळणारा एकूण परतावा याच्या सहाय्याने कंपनी ही मजल मारेल, अशी खात्री आहे.
----
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. : लक्ष्य - ४९०
भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी पुढील अनेक वर्षे वाढ दाखवण्यास सज्ज झाली आहे. त्यांचे ऑर्डर बुक एक लाख कोटींपेक्षाही मोठे असून, त्यात त्यांना ३०० अब्ज रुपयांची ‘अनंतशस्त्र’ या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या शीघ्रगती क्षेपणास्त्र प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. कोचीन शिपयार्डची ६३३ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ९७ हलकी लढाऊ विमाने, एमकेवनए यांच्या यंत्रणांचे तसेच इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र सामुग्रीचे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या यंत्रणांची कामे कंपनीला मिळाली आहेत. कंपनीची निर्यातही वाढत असल्यामुळे त्यांच्या कामकाजाची व्याप्ती आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रातील त्यांचे धोरणात्मक महत्त्व चांगलेच वाढत आहे. कामे पूर्ण करण्याचे त्याचे प्रमाण चांगले असल्याने त्यांची नफाक्षमता २७.४% तर महसूल १५% वार्षिक चक्रवाढ दराने वाढण्याचा अंदाज आहे. विविध यंत्रणांचे आणि उपयंत्रणांचे स्वदेशीकरण करण्यावर त्यांचा भर असल्याने तसेच कामकाजातील शिस्त आणि ९४ अब्ज रुपयांचा रोकड साठा यामुळे कंपनी सातत्यपूर्ण नफा देण्याची खात्री आहे. विक्री, ईबीआयटीडीए आणि करोत्तर नफा यांच्यात आर्थिक वर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान अनुक्रमे १८%, १७% आणि १७% वार्षिक चक्रवाढ दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. सेनादल, नौदल आणि हवाई दल यांच्याकडून कामांच्या अनेक धोरणात्मक संधी कंपनीला मिळणार असल्याने बी.ई.एल. ही जोमदार आणि सातत्यपूर्ण दीर्घकालीन वाढ दाखवण्याच्या तयारीत आहे.
-----
रिलायन्स इंडस्ट्रीज : लक्ष्य - १,६८५
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या सर्व प्रमुख व्यवसायांमध्ये विस्तृत वाढ दाखवल्याने या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्यांची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट झाली आहे. रिलायन्स रिटेलने चांगली उसळी घेतली असून, जीएसटी दरातील सुसूत्रीकरण, उत्सव कालावधीत ग्राहकांकडून आलेली मोठी मागणी आणि जिओमार्टमार्फत दूरदूरच्या बाजारपेठांमध्ये त्यांनी त्वरेने दिलेली डिलिव्हरी याचा रिलायन्स रिटेलला फायदा झाला. रिलायन्सच्या ग्राहक उपयोगी ब्रँडनादेखील मोठी महसूलवाढ मिळाली असून, त्यांचा बाजारवाटाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रिलायन्स जिओने ग्राहक संख्येमधील वाढ सुरूच ठेवली असून, फाईव्ह-जी आणि फिक्स वायरलेस ॲक्सेस तंत्रज्ञानाचा वापर वाढवल्यामुळे त्यांचा ईबीआयटीडीए मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उत्पन्नदेखील सुधारले आहे. प्रकल्पांचे विद्युतीकरण तसेच त्वरित परतावा मिळणारी कामे क्षेत्रातही त्यांनी चांगली उभारी घेतली असून चांगले उत्पादन, तेल शुद्धीकरण विभागाची चांगली नफाक्षमता आणि यंत्रणेचा पुरेपूर वापर, याचा फायदा त्यांना झाला आहे. काही बाबतीत कच्चा माल मिळवण्यात चढ-उतार असले तरी त्यावरही त्यांनी मात केली आहे. कच्चे तेल मिळवण्यासाठी विविध मार्ग, विविध स्रोत अवलंबणे, मध्य पूर्वेतून जास्त कच्चे तेल खरेदी करणे. त्याद्वारे रशियातून होणाऱ्या आयातीबाबत समतोल साधणे, पुरवठा साखळीत वाढ करणे, याद्वारे भूराजकीय तणावांवर मात करणे या बाबी करून त्यांनी नफाक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर भांडवलाचे योग्य शिस्तबद्ध वाटप, पुरेशा रोकड प्रवाहाची निर्मिती, तसेच ऊर्जा, ग्राहक क्षेत्र, डिजिटल आणि स्वच्छ ऊर्जा अशा वैविध्यपूर्ण व्यवसायाची परियंत्रणा उभी करून दीर्घकालीन वाढ आणि मूल्यनिर्मिती करण्यास रिलायन्स सज्ज आहे.
----
हिरो मोटोकॉर्प : लक्ष्य - ६,१६८
हिरो मोटोकॉर्पने यंदाच्या सणासुदीच्या हंगामात कामगिरीत वेगवान वाढ दाखवली आहे. त्यांच्या सर्व विक्रेत्यांची कामगिरीही उंचावली असून, या संपूर्ण सणासुदीच्या हंगामात त्यांची विक्रमी विक्री होण्याची अपेक्षा आहे. जीएसटी दरात सरकारने कपात केल्याचा फायदा त्यांच्या ९५% उत्पादनांना होणार आहे. तसेच सणासुदीत वाढलेल्या मागणीमुळे त्यांच्या सर्वच विक्रीत वाढ दिसेल. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये हिरो मोटर कॉर्प लिमिटेडच्या वाहन विक्रीच्या संख्येत एक टक्का वाढ होईल. मात्र, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये त्यांच्या देशी व्यवसायात सहा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. दोन्ही वर्षात त्यांची नफा क्षमता ०.३०% वाढण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील मागणीत होणारी निश्चित पण ठाम स्वरूपातील वाढ, तर स्वस्त वाहनांच्या क्षेत्रातील त्यांची भक्कम उपस्थिती, या दोघांचाही फायदा कंपनीला मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे महसूल, ईबीआयटीडीए, करोत्तर नफा यांच्यात अंदाजे सात टक्के, आठ टक्के आणि नऊ टक्के दराने वाढ होऊन आर्थिक वर्ष २०२५ ते २०२७ दरम्यान सातत्यपूर्ण वाढ दाखविण्यासाठी कंपनी सज्ज आहे.
-----
लॉरस लॅब : लक्ष्य - १,०१०
लॉरेस लॅब ही सीडीएमओ क्षेत्रातील प्रमुख भारतीय औषधी निर्मिती कंपनी आहे. अमेरिकेत झालेल्या घडामोडींचा त्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकी सेनेटने एन.डी.ए. कायदा तसेच बायोसिक्युअर कायदा संमत केला आहे. त्याद्वारे सरकारी यंत्रणांना काही चिनी कंपन्यांकडून बायोटेक उपकरणे आणि सेवा घेण्यास प्रतिबंध लादण्यात आला आहे. त्यामुळे लॉरेस लॅबसारख्या भारतीय सीडीएमओ कंपन्यांना अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीचे ११० पेक्षा जास्त प्रकल्प असून अनेक नवीन उत्पादनांसाठी प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्यांना कित्येक जेनरिक एफडीएफ कामे मिळत असल्याने त्यांच्या सीडीएमओ व्यवसायाची वाढ सातत्यपूर्ण राहून कंपनीला मोठा फायदा होईल. कंपनीच्या कामकाजाची व्याप्ती आणि कार्यक्षमता यामुळे त्यांच्या नफा क्षमतेत मोठी वाढ होईल. सीडीएम क्षेत्रातील त्यांची कामे आणि एफडीएफ (फिनिश्ड डोसेज फॉर्म) तसेच कृषीशास्त्र व्यवसायातील भविष्यात त्यांच्या हातात असलेल्या ऑर्डर, यामुळे लॉरेस लॅबला चांगले उत्पन्न मिळण्याची खात्री आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

