प्रवीण दरेकर यांचा स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा

प्रवीण दरेकर यांचा स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा

Published on

स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे व्हिजन महत्त्वाचे
चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत; दरेकरांनी घेतली अध्यक्षपदाची सूत्रे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे व्हिजन अध्यक्ष प्रवीण दरेकर तयार करतील, ते पुढच्या विकसित महाराष्ट्रासाठी महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे दरेकर यांच्या अध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील गरीब माणसाला घरे मिळावीत हा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी दरेकर यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील गरिबांना केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून घरे मिळतील. मुंबईतील महसूलच्या जागा, मिलच्या जागा, खासगी जागांचा विकास करण्यासाठी या प्राधिकरणाची गरज होती. दरेकर यांच्या या विषयातील अभ्यासाचा फायदा विकसित महाराष्ट्रासाठी होईल. महसूलच्या जागांवर गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम करायचे असेल तर महसूल खात्याचे धोरण ठरवण्याचे, त्यात सुधारणा करण्याचे काम स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाला दिले जाईल. दरेकर विकसित महाराष्ट्र ही संकल्पना पुढे नेतील, असा विश्वास आहे.
यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम, मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आदी उपस्थित होते.
----
मुंबईचा अध्यादेश राज्यात लागू करावा!
पुनर्विकास हा निरंतर चालणारा विषय असून सरकारने त्यास पाठबळ देण्याची गरज आहे. माझ्या अभ्यास गटाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असून त्याबाबत अध्यादेश काढावेत. स्वयंपुनर्विकासासाठी मुंबईसाठी काढलेला अध्यादेश संपूर्ण राज्यभरात लागू करावा. नियोजन, प्राधिकरण व आराखड्याचे पूर्ण अधिकार असावेत, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. मराठी माणसांसाठी काहीजण केवळ बोलतात; पण कृती केवळ देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवाभाऊंसारखे बळ बावनकुळे यांनीही द्यावे, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
----
दरेकरांवर शुभेच्छांचा वर्षाव
स्वयंपुनर्विकासाला गतिमान करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यामागचे सर्व श्रेय दरेकरांना आहे, अशा शुभेच्छा मंत्री आशीष शेलार यांनी दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दरेकर यांच्या हाती प्राधिकरणाची सूत्रे सोपवली, याबद्दल गृहनिर्माण व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी त्यांचे आभार मानले. प्राधिकरणामुळे मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com