कोट्यवधींची जमीन अतिक्रमणमुक्त

कोट्यवधींची जमीन अतिक्रमणमुक्त

Published on

कोट्यवधींची जमीन अतिक्रमणमुक्त
सिडकोची १,८०० बेकायदा बांधकामांवर कारवाई
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ ः सिडकोची जागा हडपणाऱ्या भूमाफियांसाठी वर्षभराचा कालावधी कर्दनकाळ ठरला आहे. कारण जानेवारी ते सप्टेंबरच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईतील १,८०४ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करताना तीन हजार कोटींची जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे.
नवी मुंबई, पनवेल, उलवे, द्रोणागिरी परिसरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर विनापरवानगी इमारती उभारत भूमाफियांनी सिडकोची शेकडो एकर जागा गिळंकृत केली आहे. उशिरा जाग आलेल्या सिडको व्यवस्थापनाने अशी अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाने दररोज बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. नऊ महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबई, पनवेल पालिकेसह उर्वरित सिडकोच्या दक्षिण क्षेत्रातील सिडकोच्या भूखंडांवरील ३,९८८ नोटिसा बजावल्या होत्या. तर १७९ मोहिमांमधून १,८०४ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
-----------------------------------------
भूखंडाच्या लिलावातून आर्थिक रसद
सिडकोच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असल्याने बेकायदा बांधकामांविरोधात सिडकोची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. भविष्यात सिडकोला मोठ्या प्रमाणात जमिनीची गरज भासणार आहे. नवी मुंबईत विमानतळापाठोपाठ एज्युसिटी, मेडिसिटी, लॉजिस्टिक पार्कसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे सिडकोला जमीन, निधीची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त झालेल्या काही भूखंडांची सिडकोकडून विक्री करण्यात येणार आहे.
----------------------------------------
नवी मुंबई शहराची अनिर्बंध वाढ रोखणे, हे सिडकोचे प्रमुख कर्तव्य आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. भविष्यात बेकायदा बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्याची यादी सिडकोने तयार केली आहे.
- सुरेश मेंगडे (मुख्य दक्षता अधिकारी-सिडको)
------------------------
मोहिमांची संख्या - १७९
बजावलेल्या नोटिसा - ३,९८८
बांधकामे जमीनदोस्त - १,८०४
अतिक्रमणमुक्त जमीन - २,३९,७०१ चौ.मी.
बाजारमूल्य - ३,००० कोटींहून अधिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com