महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे लोखंडी कमान धोकादायक;

महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे लोखंडी कमान धोकादायक;

Published on

महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे लोखंडी कमान कोसळली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे पूर्व मीठ बंदर रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिसरात ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणाचे अजून एक उदाहरण समोर आले आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी उभारलेली लोखंडी कमान पूर्णपणे गंजून आता जीवघेणी ठरली आहे. मंगळवारी (ता. २८) रात्री या कमानीचा पाच फूट लांबीचा लोखंडी चॅनल अचानक खाली पडला. सुदैवाने त्या वेळी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
महापालिका फक्त नवीन प्रकल्पांचे उद्‍घाटन करण्यात व्यस्त असते, पण जुन्या रचनांची नियमित देखभाल करण्याकडे लक्ष देत नाही. हा निष्काळजीपणा थेट नागरिकांच्या जीवाशी खेळणारा आहे. परिसरातील रहिवाशांनी तातडीने या कमानीची तपासणी करून ती हटविण्याची मागणी केली आहे. कमानीचा पाया आणि वरील रचना सर्वच बाजूंनी पूर्णपणे गंजल्यामुळे ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दररोज या मार्गावरून हजारो नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनधारक जातात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील आजवर महापालिकेकडून कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटलं, महापालिका नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून फक्त दिखाऊ प्रकल्प, फलक आणि सेल्फी पॉईंटवर लक्ष केंद्रीत करते. मात्र, या निष्काळजी प्रशासनामुळे कोणाचाही जीव गेला, तर जबाबदारी कोणाची? दरम्यान, या प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, घटनेची माहिती घेत आहोत. आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com