भाजी उत्पादकांवर संकट
भाजी उत्पादकांवर संकट
पावसाने आवक-विक्रीचे गणित बिघडले
जुईनगर, ता. ३० (बातमीदार) ः वातावरणातील बदलांचा परिणाम विविध घटकांवर जाणवत आहे. पावसाने भातशेतीबरोबर भाजी उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. अशातच रमजान, छटपूजेमुळे आवक-विक्रीचे गणित बिघडल्याने भावांमध्ये चढ-उतार दिसत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला बाजार संकटात आला आहे. सध्या बाजारात येणार माल हा १० टक्के शेतकरी आणि ९० टक्के स्थानिक व्यापाऱ्यांकडून येत आहे. शासन धोरणानुसार बाजार समिती वगळता सर्वत्र शेतमाल विक्रीची मुभा असल्याने उपनगरांमध्ये शेतमाल जात आहे. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात जवळपास ९०० हून अधिक व्यापारी आहेत. यातील ७०० व्यापारी मराठी असून २०० व्यापारी मुळात परप्रांतीय आहेत. प्रतिदिन सरासरी ६०० ते ६५० टेम्पो, ट्रक अशी वाहने बाजारात भाजीपाला घेऊन येतात. अशातच राज्यभर पडणाऱ्या पावसाने कमी झालेला पुरवठा तसेच सणासुदीच्या कालावधीत परप्रांतीय व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने भावांमधील चढउतार त्रासदायक ठरत आहे.
-----------------------
भाजीचे प्रकार सध्याचे भाव (प्रतिकिलो)
भेंडी ४८ ते ५२
भोपळा २० ते २४
चवळी ३० ते ४०
फरसबी ४० ते ५०
फ्लॉवर १२ ते १६
गाजर २६ ते ३६
गवार ५० ते ७०
घेवडा ६० ते ७०
काकडी २० ते २४
कारली १४ ते १८
कोबी १० ते १४
ढोबळी मिरची ३० ते ४०
पडवळ १४ ते २०
शेवगा शेंग ६० ते ८०
दोडका २६ ते ४०
टोमॅटो १० ते १३
तोंडली २८ ते ३२
वांगी २० ते ३०
-------------------------
जुडीचे भाव
मेथी २० ते २२
कोथिंबीर १० ते १२
-----------------------------
वातावरणाचा परिणाम भाजीपाला बाजारावर होत असतो. बाजार समितीत एकमेव भाजीपाला बाजार असताना २०१६ला शासनाने खुले धोरण केल्याने मार्केट सोडून सर्वत्र भाजीपाला विकला जातो. त्यामुळे घाऊक बाजारात ग्राहक कमी आहेत.
- कैलास ताजणे, अध्यक्ष, जुना भाजी बाजार व्यापारी संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

