वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Published on

सकाळ इम्पॅक्ट
----
मृत्यूदर कमी करण्यासाठी
तातडीने उपाययोजना करा!
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
मुंबई, ता. ३० ः राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूदरवाढीचे वृत्त ‘सकाळ’ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बैठक घेतली. या वेळी सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.
शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी वैद्यकीय सेवेत तत्काळ सुधारणा घडवून आणाव्यात. आवश्यक मनुष्यबळ, निधी आणि उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी. अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या, मनुष्यबळ वाढविणे, औषधे व आधुनिक उपकरणे पुरविणे आणि दीर्घकालीन सुधारणा आराखडा तयार करण्याचेही निर्देश मुश्रीफ यांनी दिले. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून शेवटच्या टप्प्यात शासकीय रुग्णालयात स्थलांतरित होत असल्यानेही आयसीयूतील मृत्यूदर तुलनेने अधिक दिसत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करत पारदर्शक चौकशी आणि मजबूत सुधारणा आराखडा आखला आहे. रुग्णालयातील सेवांची गुणवत्ता वाढण्यासाठी ठोस उपाययोजना अमलात आणण्यात येत आहेत.
----
तत्काळ उपाययोजना
- ‘आयसीयू’मध्ये आवश्यक तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व महत्त्वाची औषधे तातडीने उपलब्ध करावीत
- अतिगंभीर रुग्णांना आवश्यकतेनुसार जे.जे. रुग्णालयात सुसज्ज रुग्णवाहिकेतून स्थलांतरित करावे
---
दीर्घकालीन उपाययोजना
- सेंट जॉर्जेस रुग्णालयात मनुष्यबळ, औषधसाठा आणि आयसीयू खाटा वाढवाव्यात
- सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा सखोल आढावा घेऊन सेवा गुणवत्ता उंचावणे
- सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा मृत्यूदराचा मासिक आढावा घेण्याचा निर्णय
- आवश्यक निधी, मानव संसाधन व औषध पुरवठा प्राधान्याने उपलब्ध करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com