मोर्च्यासाठी मविआच्या सर्व नेत्यांची एकजूट

मोर्च्यासाठी मविआच्या सर्व नेत्यांची एकजूट

Published on

मोर्चासाठी मविआच्या सर्व नेत्यांची एकजूट
शरद पवारही राहणार उपस्थित

मुंबई, ता. ३० ः राज्यातील विविध मतदारसंघांत मतदार यादीतील घोळाविरुद्ध महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी मुंबईत शनिवारी (ता. १) ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यासाठी वज्रमूठ बांधली आहे. या मोर्च्यात राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे आदी नेते सहभागी होणार आहेत.
या बैठकीस शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि अनिल परब तसेच मनसेचे राज ठाकरे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नसीम खान, सचिन सावंत, भाकपचे प्रकाश रेड्डी व सुभाष लांडे, शेकापचे जयंत पाटील हे नेते उपस्थित होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात गुरुवारी (ता. ३०) मोर्चाच्या तयारीचा आढावा महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील प्रमुखांकडून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात मोर्चासह पुढे राज्य आणि केंद्र सरकारविरोधात तसेच निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची तयार कशी असेल याची घोषणा मोर्चात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील मोर्चात मतचोरी आणि मतदार याद्यांतील घोळांविरुद्ध आंदोलनाची सुरुवात होणार असून, यात राज्यभरातील विविध पक्ष संघटनांचे प्रमुख सहभागी होतील. तर या मोर्चाचा समारोप आझाद मैदानासमोरील रस्त्यावर एका सभेने होणार असून, या सभेस वरिष्ठ नेते संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होतील की नाही, याबाबत मात्र अद्याप साशंकता आहे. या मोर्चात काँग्रेस पक्षाच्या वतीने कोण सहभागी होतील हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी या बैठकीनंतर दिली. दरम्यान, नेते अनिल परब यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना निवडणुकीतील गैरव्यवहार, निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ चव्हाट्यावर मांडण्यासाठी हा सत्याचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात लाखाच्या जवळपास लोक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
...
असा असेल मोर्चा...
मोर्चाची सुरुवात दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून येथून होईल. पुढे मेट्रो सिनेमाच्या समोरून तो मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबेल. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी १ वाजता मोर्चा सुरू होऊन त्याचा समारोप ४ वाजण्यापूर्वी करण्याचे नियोजन असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
...
अद्याप परवानगी नाही!
स्थानिक पोलिस प्रशासनाकडे मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली आहे; मात्र अद्याप ती परवानगी स्थानिक प्रशासनाकडून मिळाली नाही. यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून ही परवानगी मोर्चाच्या ४८ तासांपूर्वीही मिळेल, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com