राज्य कला विद्यापीठासाठी नव्याने आढावा 
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सकारात्मक

राज्य कला विद्यापीठासाठी नव्याने आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सकारात्मक

Published on

राज्य कला विद्यापीठासाठी नव्याने आढावा
सरकार सकारात्मक; पुढील आठवड्यात बैठक
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः राज्यात चित्रकलेच्या पदवी, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना हक्काचे राज्य कला विद्यापीठ मिळावे, यासाठी मागील १८ वर्षांपासून विविध संघटना आणि तज्ज्ञांकडून मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कला विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुढील आठवड्यात बैठक घेणार आहेत. याबाबत त्यांनी राज्य कला संचालनालयाला सूचना दिल्या आहेत.
राज्य कला विद्यापीठ स्थापनेसाठी राज्यातील असंख्य चित्रकार, कलावंत, ज्येष्ठ साहित्यिकांकडून मागणी केली जात आहे; मात्र काही संधीसाधू व्यावसायिकांनी हे विद्यापीठ होऊ नये, यासाठी आडकाठ्या आणल्या जात असल्याने हा विषय मागील काही वर्षांपासून प्रलंबित राहिला होता. राज्य कला संचालनालयाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या सर्व कला महाविद्यालयांना एका छताखाली आणण्यासाठी स्वतंत्र ‍कला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम १९८६ मध्ये झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या विद्यापीठाला तत्त्वतः मान्यता दिली होती; परंतु पुढे हा विषय बारगळला. मागील १८ वर्षांत यासंदर्भात सरकारकडे अनेकदा मागण्या, निवेदने देण्यात आली, मात्र आजतागायत विषय प्रलंबित राहिला आहे.
----
डी-नोव्हातून खासगीकरण
राज्य कला विद्यापीठाची मागणी होत असताना, काही मंडळींनी आपण त्या गुणवत्तेत बसत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी डी-नोव्हा अभिमत विद्यापीठाचा घाट घातला आणि ते यशस्वी झाले. या विद्यापीठाच्या समितीवर सरकारचे प्रतिनिधी असले, तरी खासगी मंडळींची वर्णी लागली. बहुतांश कारभार आणि निर्णय या मंडळींच्या माध्यमातून सुरू आहे.
--
हेरिटेज इमारतींचा ताबा
विद्यापीठाच्या नावाखाली तीनहून अधिक हेरिटेज इमारतींचा ताबा डी-नोव्हाकडे आला आहे. राज्यात कला शिक्षणाचा वारसा चालविणाऱ्या जे. जे. कला संचालनालयाची दुरवस्था झाली आहे. त्यांना एका जुन्या इमारतीत जागा देण्यात आल्याने यावर राज्यातील चित्रकार, कलावंतांनी नाराजीही व्यक्त केली. आता सरकारतर्फे विक्रोळीतील एलबीएस मार्गावरील मोक्याची जागा उपकेंद्रासाठी दिली जाणार असल्याने त्यावरही वाद रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com