पालिका आयुक्तांच्या निवासावर चक्क १३० मतदार नोंदणी

पालिका आयुक्तांच्या निवासावर चक्क १३० मतदार नोंदणी

Published on

पालिका आयुक्तांच्या निवासावर चक्क १३० मतदार नोंदणी
मनसेचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० ः नवी मुंबई शहरात सुलभ शौचालय, पाम बीच मार्ग या ठिकाणी मतदारांची नावनोंदणी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता चक्क महापालिका आयुक्तांच्या निवासाच्या नावावर मतदार नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. सुमारे १३० मतदारांनी आयुक्त निवास हा पत्ता दाखवला आहे. या प्रकारामुळे मनसे संतप्त झाली आहे.
सानपाडा येथे पाम बीच रोडवर २५० मतदार असल्याचे समोर आले होते. आता नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्या घरात जवळपास १३० मतदार असल्याचे आढळून आले. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील यादी क्रमांक ३००मध्ये हे मतदार असल्याचे दिसून येते. निवडणूक आयोगाने हे घोळ तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवी मुंबई शहरातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल ७६ हजार दुबार नावे असल्याची तक्रार काँग्रेसतर्फे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी दिली आहे. त्यावर प्रशासनातर्फे काम सुरू असून नावे रद्द केली जात असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे; मात्र राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५पर्यंत मतदार यादी जाहीर केली असून या यादीनुसार महापालिका कार्यरत आहे. या मतदार यादीत घोळ असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com