एशियाटिकच्या अध्यक्षपदासाठी केतकर, सहस्त्रबुद्धे यांच्यात लढत
एशियाटिकच्या अध्यक्षपदासाठी
केतकर, सहस्रबुद्धे यांच्यात लढत
उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
मुंबई, ता. ३० ः मुंबईतील प्रतिष्ठित एशियाटिक व्यवस्थापन समितीच्या २०२५-२०२७ वर्षासाठी होणाऱ्या एकूण १२ पदांसाठी ८ नोव्हेंबरला मतदान होत आहे. यासाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि विनय सहस्रबुद्धे यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एशियाटिकच्या निवडणुकीत चार उपाध्यक्षपदांसाठी १४ उमेदवारी अर्ज आले होते. त्यातील १३ अर्ज मंजूर झाले आहेत. ए. डी. सावंत, अर्जुन डांगळे, अरुण शंकर, चंद्रशेखर द्विवेदी, दीपक पवार, नितीश भारद्वाज, नोब्बी प्रियाराम, रमेश पतंगे, रेणू पारेख, संजय देशमुख, शोस्मिता मुखर्जी, सुनील कदम, उषा विजयालक्ष्मी यांचा समावेश आहे. छाननी समितीच्या सात जागांसाठी १२ उमेदवारांचे अर्ज आले. त्यात अभिजित मुळे, अमोल जाधव, अनाहिता तारपोरे, अनिल सावंत, दत्तात्रय पंचवाघ, देवदत्ता मालशे, माधवी नरसाळे, मल्हार गोखले, पंकज समेळ, स्नेहा नगरकर आणि उमंग काळे यांचा समावेश आहे. व्यवस्थापन समितीसाठी १६ जणांचे अर्ज आले असून, यात सहा पदे २०२५ ते २०२७ या कालावधीची, तर पाच पदे २०२५-२०२८ या कालवधीसाठी असतील. त्यात भरत गोठसकर, इब्राहिम अफगाण, कुंदा प्रमिला नीलकंठ, माधव भंडारी, मल्हार कुलकर्णी, नंदिनी आत्मसिद्ध, प्राची मोघे, प्रमोद बापट, राजेश बेहरे, रमा बिश्नोई, रामचंद्रन व्यंकटेश, सविथा सुरी, सुनंदा भोसेकर, स्वाती दाते, उर्वशी आस्था आणि व्ही. एम. चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
---
धर्मादायची नोटीस अडचणीची?
एशियाटिकची ही निवडणूक यंदा अचानक सदस्यांची संख्या वाढल्याने चर्चेत आली आहे. यापूर्वीच असलेल्या सुमारे तीन हजार ५०० सदस्यांमध्ये आता नव्याने नोंद झालेल्या एक हजार ६०० हून अधिक नव्या सदस्यांची भर पडणार आहे. सदस्यांच्या अर्जांची छाननी व ओळखपत्रे तयार करण्यात सोसायटीची दमछाक होत आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेली नोटीसही अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

