टांगा पलटी...घोडे फरार...

टांगा पलटी...घोडे फरार...

Published on

टांगा पलटी... घोडे फरार...
रोह्यात गोगावलेंची खासदार तटकरेंवर टीका
रोहा, ता. १ (बातमीदार) ः लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले; पण त्यांना त्या गोष्टींची जाण नाही. आम्ही मनात आणला असते तर जराशी मान वाकडी केली असती तर त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, अशी जोरदार फटकेबाजी मंत्री भरत गोगावले यांनी केली.
रोहा मोहल्ला येथील पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
रोहेकर जनतेला आता बदल हवाय. तुम्ही आम्हाला साथ द्या, एकहाती सत्ता द्या, आम्ही रोहा बदलून दाखवणार. फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला मतरूपी आशीर्वाद द्या. आम्ही मंत्रिपदाचा तोरा कधी मिरवत नाही, असा हल्लाबोल त्यांनी खा. सुनील तटकरेंवर केला. या वेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, माणगाव तालुकाप्रमुख ॲड. मानकर, अल्पसंख्याक विभाग तालुकाप्रमुख उस्मान रोहेकर, शहरप्रमुख मंगेश रावकर, महिला आघाडी प्रमुख ॲड. मयूरा मोरे, माजी नगराध्यक्ष लालता कुशवहा, शहर संघटक प्रकाश कोळी आदी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
------------------------------------------
‘रोहेकरांना बदल हवा’
गेल्या ७० वर्षांत समाजात गैरसमज निर्माण करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने मुस्लिम समाजाचा वापर करून घेतला. माझ्या मतदारसंघात ६० मोहल्ल्यांचा समावेश आहे. त्यापैकी एकाही गावात दंगा झाला नाही. या वेळी सत्ता दिल्यास रोहा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com