गडसंवर्धनाच्या कार्यातून इतिहासाची प्रेरणा!

गडसंवर्धनाच्या कार्यातून इतिहासाची प्रेरणा!

Published on

गड संवर्धनाच्या कार्यातून इतिहासाची प्रेरणा!
बालकलाकारांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या
माणगाव, ता. १ (वार्ताहर) ः माणगाव येथील आम्ही सह्याद्रीचे शिलेदार, ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गडकोट संवर्धनासह विविध सामाजिक उपक्रमांद्वारे इतिहासप्रेम आणि समाजजागृतीचे कार्य करत आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माणगाव तालुक्यातील मानगड, कुर्डुगड तसेच महाड तालुक्यातील कोकणदिवा किल्ल्यावर नियमितपणे गड संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. गडांचे स्वच्छता अभियान, ऐतिहासिक वस्तू आणि वीरगळ संवर्धन, तसेच गरजूंना मदत, पर्यावरणपूरक उपक्रम आणि ऐतिहासिक जागरूकता निर्माण करण्याचे काम संस्था सातत्याने करीत आहे.
संस्थेच्या या प्रयत्नांतून अलीकडेच एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला. किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून बालकलाकारांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून इतिहासाला नव्या दृष्टिकोनातून सादर केले. स्पर्धेत विघवली येथील आम्ही कलाकार छोटे-मोठे, या गटाने सिंहगड किल्ल्याची मोहक प्रतिकृती साकारत प्रथम क्रमांक पटकावला. माणगावचे मयुरेश बापट यांनी ‘मानाचा मानगड’ किल्ल्याची प्रतिकृती तयार करून द्वितीय क्रमांक मिळवला, तर चेरवली येथील अभी योगेश खडतर यांनी ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याची प्रतिकृती साकारून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच होडगाव येथील ओम खाडे, हर्षल खाडे, अथर्व खाडे, सार्थक शिंदे आणि शौर्य खाडे या बालकलाकारांनी ‘प्रतापगड’ किल्ल्याची अप्रतिम प्रतिकृती साकारत उत्साहवर्धक मानकरी म्हणून गौरव प्राप्त केला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता, की नव्या पिढीत गड संवर्धनाची आणि इतिहासाबद्दलच्या अभिमानाची जाणीव निर्माण करणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकिल्ले हे फक्त वास्तू नसून, ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. या स्पर्धेतून मुलांमध्ये इतिहासाची आवड, टीमवर्क, शिस्त, देशभक्ती आणि संवर्धनाची जबाबदारी अशा मूल्यांची रुजवण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com