दुचाकी अपघात चालकाचा मृत्यू

दुचाकी अपघात चालकाचा मृत्यू
Published on

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू
नवीन पनवेल (बातमीदार) ः भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. पनवेलजवळील चिंचपाडा उड्डाणपुलाजवळ गुरुवारी (ता. ३०) रात्रीच्या वेळी झाला. या वेळी त्याचा सहकारी जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेलजवळील चिंचपाडा उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर सचिन पवार (२०)सोबत असलेला त्याचा मित्र विशाल जाधवला (२१) घेऊन दुचाकीवरून उड्डाणपुलाकडे जात असताना घसरली. या वेळी अपघातात सचिन पवारचा मृत्यू झाला तर विशाल जाधव जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com