विसंवादामुळे घात

विसंवादामुळे घात

Published on

विसंवादामुळे घात
अल्पवयीन मुले पळून जाण्याच्या ५२ घटना
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर)ः प्रेमप्रकरणे, घरगुती वादातून अल्पवयीन मुले घरातून पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील ५२ मुले पळून गेल्याच्या तक्रारी विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पालक-मुलांमधील विसंवाद घातक ठरत आहे.
विभक्त कुटुंब पद्धती, वाढत्या महागाईमुळे आई-वडिलांवर नोकरी करण्याची वेळ, पर्यायाने मुलांबरोबरचा पालकांमधील विसंवाद वाढला आहे. अशातच मोबाईल, विविध समाजमाध्यमांमुळे विविध गोष्टींचा मनावरील पगडा मुलांमध्ये नकारात्मक भावना वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. रायगड जिल्ह्यात २०२५मध्ये ५२ मुलेही घरातून पळून गेल्याची नोंद आहे. या प्रकरणांमध्ये ४९ मुलांना परत आणण्यात यश आले आहे. पण मुलींशी मनमोकळेपणाने संवाद होत नसल्याने नातेसंबंधांमधील तणाव अशा घटनांसाठी निमित्त ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
------------------------
पोलिसांकडून समुपदेशन
- पोलिस काका, पोलिस दीदी उपक्रमामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती, समुपदेशन केले जाते. मुलांना पळून जाणे, गुन्हेगारी कलमे इत्यादींबद्दल सांगितले जाते; परंतु पोलिस प्रशासन हे पालक आणि शाळेची भूमिका बजावू शकत नाहीत. घरातून मुले पळून जाणे या प्रकाराला पालक आणि मुलांमधील विसंवाद हेच मुख्य कारण असल्याचे रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले.
- बचपन बचाओ आंदोलकांनी २०११मध्ये न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेला मुलगा बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास गुन्हा नोंदवला जातो, असे अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले.
-------------------------------
पालकांची भूमिका
मुलांची मानसिकता पालकांनी समजून घ्यायला हवी. त्यांच्यासोबत वेळोवळी संवाद साधायला हवा. व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक मुलांना वेळीच लक्षात आणून देणे गरजेचे आहे. कौटुंबिक जबाबदारीची योग्यवेळी जाणीव करून देताना जीवन जगण्याचे कसब आत्मसात करून द्यायला हवे.
-------------------------------
नकारात्मक विचारांची कारणे
- पालकांशी असलेला मुलांचा विसंवाद
- कोवळ्या वयातील आकर्षण
- नातेवाइकांकडून मिळणारी वागणूक
- मित्र-मैत्रिणींमध्ये होणारी चेष्टा
-------------------------------------
१४ ते १७ वयोगटातील मुली-मुलांच्या शरीरात बदल होत असतात. या काळात एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडल्यास भावनिक गोंधळ सुरू असतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी वेळोवेळी संवाद साधणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट लादण्यापेक्षा त्याचे चांगले-वाईट परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे.
- मृण्मयी वैशंपायन, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com