भूमिगत फायर फायटिंग यंत्रणा धूळखात
भूमिगत फायर फायटिंग यंत्रणा धूळखात
सिडको वसाहतीत सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कामोठ्यातील दुर्घटनेनंतर टीकेची झोड
नवीन पनवेल, ता. ३ (बातमीदार) ः कामोठ्यातील एका सोसायटीत लागलेल्या भीषण आगीत मायलेकींचा मृत्यू झाल्याने सिडकोच्या वसाहतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या वसाहतींमध्ये उभारण्यात आलेली भूमिगत फायर फायटिंग सिस्टीम आज अक्षरशः धूळखात पडली असून, तिचा वापर होत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.
सिडकोने पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आणि नावडे या नोड्समध्ये कॉलनी विकसित करताना रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाइट्स आणि मलनिस्सारणासह अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा निर्माण केली होती. विशेषतः नवीन पनवेल व कळंबोली या वसाहतींमध्ये भूमिगत फायर फायटिंग सिस्टीम तयार करण्यात आली होती. रस्त्यांच्या कडेला अग्निशमन वाहिन्या टाकून आग लागल्यास त्याद्वारे उच्च दाबाने पाणी मारण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या पाइपलाइन्सची दुरुस्ती वा तपासणी न झाल्याने ती आता निष्क्रिय झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. अग्निसुरक्षेसाठी ही प्रणाली महत्त्वाची असून, आग लागल्याच्या वेळी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यात ती प्रभावी ठरू शकते, परंतु प्रत्यक्षात ही यंत्रणा कधीच कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे सिडकोने ही व्यवस्था फक्त दाखवण्यासाठी उभारली होती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
..............
अग्निशमन सेवेचे हस्तांतरण
पूर्वी सिडकोकडे असणारी अग्निशमन सेवा आता पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तथापि, सिडकोप्रमाणेच महापालिकेनेही भूमिगत फायर सिस्टीमबाबत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोन्ही संस्थांची उदासीनता उघड झाली आहे. माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी सांगितले, की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात अत्याधुनिक अग्निशमन व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. सिडकोची भूमिगत फायर सिस्टीम आज केवळ नावापुरती उरली असून, महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी.
..................
लवकरच अद्ययावत यंत्रणा
दरम्यान, पनवेल महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी सांगितले, की सिडकोची भूमिगत यंत्रणा जुनी झाली आहे आणि रस्त्यांवरील बदलांमुळे ती वापरणे शक्य नाही. मात्र आगामी काळात नवी, आधुनिक फायर फायटिंग सिस्टीम विकसित करण्याबाबत महापालिका सकारात्मक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

