थोडक्यात बातम्या नवी मुंबई
गोरक्षनाथ महाराज, महादेव मंदिरात जलाभिषेक
नवीन पनवेल (बातमीदार) ः भिंगारी ते वहाळ या मार्गावर ‘मामा-भाचा संगम’ नदीचे पवित्र जल घेऊन १०१ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. नाथ संप्रदायातील शेकडो अनुयायी आणि भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा गोरक्षनाथ मंदिरात जलाभिषेकाने पार पडली. हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण दुमदुमले होते. मार्गात सुवासिनींनी आरती करून यात्रेचे स्वागत केले. गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त भाविकांना मंगल स्नानाचे पुण्य मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
........
''संगीत मॅरेथॉन''मधून रामशेठ ठाकूर यांना स्वरबद्ध सलामी
पनवेल (बातमीदार) ः माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल येथे ‘उत्कर्ष संगीत मैफिल’ तर्फे संगीत मॅरेथॉनचे आयोजन झाले. या कार्यक्रमात ७५ गायकांनी सलग साडेसात तासांत ७५ गाणी सादर करत लोकनेते ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध अभिवादन दिले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या उपक्रमात गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून विविध गायकांनी मराठी व हिंदी गाणी सादर केली. कार्यक्रमाचे उद्घाटन खुद्द रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
.............
खारघरमध्ये श्रीरामकथेची तयारी; बुधवारपासून कलश यात्रा
खारघर (बातमीदार) ः राजकुमारी जगदीशप्रसाद कसेरा वेलफेअर ट्रस्टच्या वतीने खारघर येथे ६ ते १४ नोव्हेंबरदरम्यान श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिल्प चौक ते सेंट्रल पार्कपर्यंत कलश यात्रा निघणार आहे. कथा व्यास म्हणून पद्मविभूषण रामानंदाचार्य श्रीराम भद्राचार्य महाराज मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार प्रशांत ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नऊ दिवसांच्या रामकथेत सुमारे एक लाख भाविक सहभागी होणार आहेत.
............
रस्त्याचे खोदकामामुळे कामोठेकर संतप्त
पनवेल (बातमीदार) ः कामोठेतील मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे काहीच दिवसांत पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी खोदकाम केल्याने रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. एका बाजूला पालिका कोट्यवधी खर्चून खड्डे बुजवते आणि दुसऱ्या आठवड्यात तोच रस्ता उखडते, अशी टीका नागरिकांनी केली. विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचे नागरिकांचे मत असून, कामांपूर्वी नियोजनबद्धता आणावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

