एसटीच्या मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प; एसटी होणार आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी

एसटीच्या मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प; एसटी होणार आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी

Published on

एसटीच्या मोकळ्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प!
दरवर्षी ३०० मेगावॉट वीजनिर्मितीचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मोकळ्या जागांवर तसेच कार्यशाळा आणि बसस्थानकांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून दरवर्षी सुमारे ३०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वर्षाकाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या वीजनिर्मितीचे हे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाद्वारे एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा मानस असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली एसटी मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, की एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यात पथदर्शक ठरेल असा एक महत्त्वाकांक्षी सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. महामंडळाच्या मोकळ्या जागांवर आणि खासगी-सार्वजनिक भागीदारीत सुरू होणाऱ्या प्रकल्पांबरोबर उरलेल्या जागांवर ‘सौरऊर्जा शेती’ उभारली जाणार आहे. सध्या एसटी महामंडळाला वार्षिक सुमारे १५ मेगावॉट विजेची गरज भासते, ज्यासाठी दरवर्षी २५ ते ३० कोटी रुपये खर्च होतात. येत्या काळात इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगसाठी सुमारे २८० मेगावॉट वीज लागेल. ही वीज सौरऊर्जेतून तयार केल्यास एसटीला दरवर्षी जवळपास एक हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते. या बचतीतून एसटीसाठी नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
...
ओसाड जागांवरही उभारणी
राज्यातील एसटीच्या विविध जागांवर ३०० मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. आवश्यकता भासल्यास सरकारच्या ओसाड जागांचा वापर शासनाच्या परवानगीने व नाममात्र भाड्यावर करण्यात येईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून मिळणारी आर्थिक मदत या प्रकल्पासाठी वापरण्यात येईल. या उपक्रमामुळे एसटीला आर्थिक मदतीसाठी वारंवार सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही. उलट एसटीचा हा ‘सौरऊर्जा हब’ संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक प्रकल्प ठरेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com