लंडनमध्ये रंगले ‘अक्षरविश्व’ संमेलन

लंडनमध्ये रंगले ‘अक्षरविश्व’ संमेलन

Published on

लंडनमध्ये रंगले ‘अक्षरविश्व’ संमेलन
पं. भीमराव पांचाळे यांनी भूषवले अध्यक्षपद

मुंबई, ता. ३ : स्नेहल आर्टस् व एज्युकेशन सोसायटी (डोंबिवली, भारत) आणि निर्वाण इव्हेंट्स (लंडन) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन लँगली (लंडन, यूके) येथे नुकतेच पार पडले. भारताबाहेर झालेल्या या संमेलनाला जगभरातील साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमींची उपस्थिती होती.
या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध गझल गायक पं. भीमराव पांचाळे यांनी भूषविले. संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून गझलकार आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, तर उद्‍घाटक म्हणून ज्येष्ठ गझलकार व माजी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे हे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर होते. अध्यक्षीय भाषणात पं. भीमराव पांचाळे म्हणाले, की विश्वबंधुत्वाची भावना जपण्यासाठी गझलची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नवीन पिढीला गझलची महती लक्षात आणून देण्याची गरज आहे. या साहित्य संमेलनामध्ये भीमराव पांचाळे आणि त्यांच्या कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे-गायकवाड यांनी मनोवेधक गजलांचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. पंडित रमाकांत गायकवाड यांनी आपले बहारदार ठुमरी गायन केले तसेच हार्मोनियमवर उत्कृष्ट साथ दिली. दरम्यान, गिरीश पाठक यांनी तबल्यावर आपले कसब दाखवत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाच्या संयोजिका कल्पना गवरे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाचा हेतू विशद केला आणि मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रसिद्ध गझल गायक सुरेश दंडे यांनी गझल गायन सादर केले. संस्थेच्या अध्यक्षा कल्पना गवरे तसेच उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्यासह भारतातील अनेक गझलकार आणि कवींनी सादरीकरण केले.
...
प्रकाशन आणि सन्मान
‘शिक्षण संजीवनी’ या दिवाळी अंकाचे, ‘अक्षरवेध’ या अंकाचे तसेच डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन याप्रसंगी झाले. निर्वाण इव्हेंट्सचे पदाधिकारी डॉ. अभिधम्म कानिंदे, नितीन इनकर, कीर्ती इनकर, लंडन महाराष्ट्र मंडळाचे समन्वयक डॉ. प्रवीण कांबळे, नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शीतल भुवनेश यांना सन्मानित करण्यात आले. माजी शिक्षण सहसंचालक (महाराष्ट्र) मकरंदजी गोंधळी यांनी नेटके सूत्रसंचालन केले. साहित्य संमेलनाचे समन्वयक डॉ. संजय जगताप यांनी आभारप्रदर्शन केले.
...
संकल्प करून समारोप
आपल्या मायमराठीच्या सन्मान आणि प्रचार-प्रसारार्थ जगातील विविध देशांमध्ये त्या त्या देशात वास्तव्यास असणाऱ्या मराठी जनांच्या सहकार्याने अशी संमेलने आयोजित करण्याचा संकल्प करून संमेलनाचा समारोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com