मतमतांतरे

मतमतांतरे

Published on

स्वप्न साकारले!
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी धूळ चारत इतिहास रचला. पहिल्यांदाच विश्वचषक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या विजयाने महिला क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला आहे. भारतीय महिला खेळाडूंनी क्रिकेटप्रेमींना क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर अविस्मरणीय विजय मिळवणाऱ्या सर्वच महिला क्रिकेटपटूंचे विशेष कौतुक.
विवेक तवटे, कळवा

महिला संघाचे अभिनंदन
विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन! शिक्षण, समाजकारण आणि राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, ही बाब देशासाठी भूषणावह आहे. महिलांची प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी कर्तबगारी समाजातील तरुण महिलावर्गाच्या भावी पिढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरत असते. भारतीय महिला क्रिकेट संघाचा अतुलनीय विजय देशातील तमाम युवतींसमोर उत्तम आदर्श ठरला आहे. त्यामुळे देशातील युवतींचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग सकारात्मक दृष्टीने वाढीस लागेल, हे निश्चित.
सुधीर कनगुटकर वांगणी
(श्रीनिवास डोंगरे, दादर यांनीही याच आशयाचे पत्र लिहिले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com