डेब्रिज माफियांची धरपकड

डेब्रिज माफियांची धरपकड

Published on

डेब्रिज माफियांची धरपकड
सिडकोकडून चार वर्षांत २३७ वाहने जप्त
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : मानवी आरोग्यास घातक डेब्रिज टाकणाऱ्या तसेच मातीचे उत्खनन करणाऱ्याविरोधात सिडकोने धडक कारवाई हाती घेतली आहे. गेल्या चार वर्षांत जवळपास ९० गुन्हे दाखल करण्यात आले असून, २३७ वाहने जप्त केली आहेत.
मुंबईसह परिसरात मोठ्या संख्येने विकासकामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणावरून निघणारे मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रिज सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागांमध्ये बेकायदा टाकण्यात येत आहे, तर काही व्यक्तींकडून नैसर्गिक मातीचे उत्खनन करून त्याची चोरी करण्यात येत आहे. या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.
--------------------------------------
९० गुन्हे दाखल
सिडकोच्या जागेवर अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांत ९० गुन्हे दाखल करून २४७ आरोपींवर कायदेशीर कारवाई केली आहे, तर २३३ ट्रक-डम्पर, चार जेसीबी, पोकलेन अशी वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईप्रमाणेच सिडकोच्या जागेवरील नैसर्गिक माती उत्खनन करून चोरी केल्याप्रकरणी २०२३ मध्ये तीन गुन्हे दाखल असून, एक कोटी ३० लाख ७५ हजारांची माती चोरीला गेली आहे.
-----------------------------------------
सिडकोच्या परिक्षेत्रात विकासकामे प्रगतिपथावर असून, सिडको परिसरात मानवी आरोग्यास हानिकारक अशा प्रकारचा कचरा, बांधकामाचा राडारोडा, उत्खननातील दगडमाती टाकण्यास सक्त मनाई आहे. अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सुरेश मेंगडे (मुख्य दक्षता अधिकारी सिडको)
---------------------------------------------------
वर्ष एकूण दाखल गुन्हे डेब्रिज गुन्हे माती चोरी गुन्हे चोरलेल्या मातीची किंमत आरोपी डम्पर ट्रक जेसीबी पोकलेन डोझर
२०२२ ०४ ०४ ०० ० ०७ ०७ ०० ०० ०० ००
२०२३ ३१ २८ ०३ १३,०७५,००० ८४ ६५ ०१ ०१ ०१ ००
२०२४ २१ २१ ०० ० ७४ ७६ ०१ ०१ ०० ०१
२०२५ ३४ ३४ ०० ० ८२ ८१ ०२ ०० ०० ००
एकूण ९० ८७ ०३ १,३०,७५,००० २४७ २२९ ०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com