फलकबाजीवर महापालिकेचा दणका

फलकबाजीवर महापालिकेचा दणका

Published on

वसई, ता. ४ (बातमीदार) : पालघर जिल्हा प्रशासनाकडून ‘स्वच्छ पालघर, सुंदर पालघर’चा नारा देण्यात आला आहे, मात्र पालघर शहरात बेकायदा बॅनर, फलक लावून विद्रुपीकरण केले जाते, तसेच सार्वजनिक ठिकाणी अपघातांचा धोकादेखील असतो. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत, गुन्हेदेखील दाखल केले जात असल्याने करबुडव्यांना चांगलाच दणका बसत आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरदेखील प्रशासनाने मोर्चा वळवला आहे.

वसई-विरार शहरात मुख्य वर्दळीचे, तसेच अंतर्गत मार्ग, पादचारी पूर, उड्डाणपूल यासह सुशोभीकरण करण्यात आलेले चौक असो की, दाटीवाटीच्या ठिकाणी कोणतीही संधी न सोडता बिनदास्तपणे फलक, बॅनर लावले जातात. गर्दीच्या ठिकाणी दर्शनी भागात मोफत जाहिरात कशी लावता येईल, यासाठी प्रयत्न केले जातो. परंतु अनेकजण प्रशासकीय परवानगीला थेट बगल देत असतात. कोणत्याही ठिकाणी फलक लावल्याने अपघात होण्याची शक्यता असते, तसेच पालिकेचे कररुपी महसुली उत्पन्न बुडते.

विनापरवानगी फलक लावून शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, यासाठी महापालिकेने जाहिरात धोरण निश्चित केले व जागा निश्चित केल्या व कराचे दरपत्रक जाहीर केले आहे. जाहिरातीसाठी स्वतंत्र परवानगी दिली जाते, परंतु तरीही परवानगी न घेता फलक लावण्यात येतात. त्यामुळे हजारो लहान फलकांवर पालिका विभागाकडून कारवाई करत ते जप्त करण्यात आले आहेत, तर मोठ बॅनर हटवून गुन्हे दाखल केले जात आहेत.

वसई-विरार महापालिकेने आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार ३१ ऑक्टोबरला धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता कुणाल घरत, लिपीक दशरथ वाघेला, सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते. महापालिकेने कारवाईचा सूर आवळला असल्याने शहरात विदुपीकरण रोखणे कितपत यशस्वी होणार, हे पुढील कार्यवाहीत स्पष्ट होणार आहे.

मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा
आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या निर्देशानुसार उपआयुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरील व शहरातील एकूण १७ फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. एका व्यक्तीवर मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहराचे विद्रुपीकरण करून अनेक भागांत विनापरवानगी बॅनर, फलक लावण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो फलक हटविण्यात आले असून गुन्हेदेखील दाखल केले आहेत. महापालिकेकडून परवानगी घेऊन फलक लावण्यात यावेत.
- अजित मुठे, उपायुक्त, वसई-विरार महापालिका

सात महिन्यांतील कारवाई
फलक हटवले १४५
गुन्हे दाखल ४३

एप्रिल ते ऑक्टोबर
कर वसुली ५ कोटी २२ लाख ५१ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com